पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्यासह 3 शास्त्रज्ञांमुळे पुन्हा चीनकडे संशयाची सुई, वुहानच्या लॅबमध्येच बनवला गेला कोरोना व्हायरस?

नवी दिल्ली : जगभरात मागील सुमारे 20 महिन्यांपासून कोरोना व्हायरसने विध्वंस चालवला आहे. आतापर्यंत यामध्ये 37 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकुण 17 कोटीपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. कोरोना व्हायरसची सुरुवात चीनच्या वुहान wuhan lab शहरातून झाली होती. अशावेळी जगभरातील शास्त्रज्ञ यावर चर्चा करत आहेत की, हा व्हायरस लॅबमध्ये तयार करण्यात आला का? शास्त्रज्ञांच्या टीमने दावा केला की, व्हायरस वुहानच्याच लॅबमध्ये wuhan lab बनवला गेला. याबाबत अमेरिकेला सुद्धा दाट संशय आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रश्न हा निर्माण होतो की, अखेर शास्त्रज्ञ कशाप्रकारे वुहानच्या लॅबकडे इशारा करत आहेत. ही बाब जाणून घेणे खुपच रंजक आहे. विशेष गोष्ट ही आहे की या सर्वात मोठ्या दाव्यात भारताच्या तीन शास्त्रज्ञांची सुद्धा महत्वाची भूमिका राहिली आहे. ते आहेत पुण्यात राहणारे शास्त्रज्ञ दाम्पत्य डॉ. राहुल बहुलिकर आणि डॉ. मोनाली राहळकर. याशिवाय आणखी एक संशोधक आहे, ज्यांनी आपले नाव सांगितलेले नाही.

रिसर्चसाठी बनवली स्पेशल टीम

अखेर कोरोना व्हायरस कुठून आला याबाबत मागील वर्षी मार्चमध्ये जगभरातील अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधन करणार्‍यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक टीम तयार केली. तिला नाव देण्यात आले DRASTIC. या टीमच्या अनेक लोकांनी सुरक्षेच्या कारणामुळे आपले नाव सांगितले नाही. डॉ. राहुल बहुलिकर आणि डॉ. मोनाली राहळकर या टीमचे सदस्य होते. याशिवाय या टीममध्ये तिसरे भारतीय संशोधक आहेत ’सीकर’. हे त्यांचे टोपण नाव आहे. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाचा दावा आहे की, ’सिकर’चे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान आहे आणि ते पूर्व भारतात राहतात. ते आर्किटेक असण्यासह चित्रपटही बनवतात. याशिवाय ते एक सायन्स टीचर सुद्धा आहेत. त्यांना चायनीज भाषेचे सुद्धा ज्ञान आहे.

असा आला वुहानच्या लॅबवर संशय

भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितले की, रिसर्चचे खरे लीड त्यांना चीनच्या एका रिसर्च थेसिसमधून मिळाले.

यामध्ये 2012 चा उल्लेख होता, ज्यामध्ये सांगितले होते की, वटवाघुळमुळे एका खाणीत सात लोक आजारी पडले, ज्यापैकी तिघांचा मृत्यू झाला.

या सर्वांमध्ये अशीच लक्षणे होती जी सामान्यपणे कोरोना रूग्णांमध्ये असतात.

खाणीतील या रहस्यमय आजाराचा खुलासा भारतीय रिसर्च ’सिकर’ ने केला. यानंतर शास्त्रज्ञांची टीम या थेअरीवर काम करू लागली.

आणि आज या गोष्टीचे पुरावे मिळाल्याचा दावा केला जात आहे की, कोरोना व्हायरस वुहानच्याच लॅबमध्ये तयार केला गेला.

काय म्हटले शास्त्रज्ञांनी

डॉ. राहळकर यांचे म्हणणे आहे की, वुहानमध्ये डब्ल्यूआयबी आणि इतर लॅब व्हायरसवर प्रयोग करत होत्या.

त्यांना या गोष्टीचा संशय आहे की, चीनच्या काही शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या जीनोममध्ये काही बदल केले होते.

यामुळे होऊ शकते की, या प्रक्रियेदरम्यान सध्याच्या कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली असावी.

त्यांचा असाही दावा आहे की, एप्रिल 2020 मध्ये त्यांनी रिसर्चला सुरूवात केली आणि आढळले की, SARS-CoV-2, RATG13 कोरोना व्हायरसला वुहानच्या लॅबने त्याच खाणीतून आणले होते.

 

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

 

सर्व ज्येष्ठांना व्हॅक्सीन दिल्यास देश मिळवू शकतो कोरोनापासून बचाव करण्याचे सुरक्षा कवच

 

‘ठाकरे बंधू एकत्र येणार?’, राज यांच्या विधानानंतर आता CM उद्धव ठाकरेंनीही दिले उत्तर, म्हणाले..