COVID-19 Virus Weight | सफरचंदाच्या वजनाएवढे आहे संपूर्ण जगात असलेल्या कोविड-19 चे वजन, जाणून घ्या रिसर्च

जगाला हादरवणार्‍या न दिसणार्‍या कोरोना व्हायरसचे वजन ( COVID-19 Virus Weight) किती आहे याची पडताळणी शास्त्रज्ञांनी केली

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चीनच्या वुहान Wuhan शहरातून 2019 मध्ये जगभरात पसरलेला कोरोना व्हायरस Corona virus संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरला आहे. तुम्हाला माहिती आहे का संपूर्ण जगात पसरलेला हा शक्तिशाली व्हायरस किती विशाल आणि जड आहे ? जगाला हादरवणार्‍या न दिसणार्‍या या व्हायरसचे वजन COVID-19 Virus Weight किती आहे याची पडताळणी शास्त्रज्ञांनी केली आहे.

एका संक्रमित व्यक्तीत असता इतके व्हायरस
लाइव्ह सायन्स वेबसाइटनुसार हा स्टडी 3 जून 2021 ला प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
रिपोर्टनुसार, संपूर्ण जगात जेवढे व्हायरस आहेत त्यांचे वजन COVID-19 Virus Weight एक नवजात बाळ किंवा सफरचंद एवढे असू शकते.
संशोधकांनुसार एका संक्रमित व्यक्तीच्या आत संसार्गाच्या उच्च स्तरावर 10 बिलियन ते 100 बिलियनपर्यंत सार्स-कोव्ह-2 चे कण असू शकतात.

महामारीत व्हायरसचे इतके असते एकुण वजन
कोरोना व्हायरस जेव्हा पीकवर असतो त्यावेळी जगभरात सुमारे 10 लाख ते 1 कोटी लोक संक्रमित होऊ शकतात.
दोन्हीचा आकड्यांच्या आधारावर निष्कर्ष काढण्यात आला की,
या सर्व लोकांमधील कोरोना व्हायरसचे एकुण वजन COVID-19 Virus Weight महामारीच्या उच्च स्तरावर 0.1 किलोग्राम ते 10 किलोग्रॅमपर्यंत असू शकते.

असे करण्यात आले संशोधन :
इस्त्रायलच्या वीझमॅन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सच्या डिपार्टमेंट ऑफ प्लांट अँड एनव्हॉयरमेंटल सायन्सेसचे प्रोफेसर आणि अभ्यासाचे मुख्य लेखक रॉन मिलो यांच्या नुसार,
हा स्टडी करण्यासाठी सर्वप्रथम सध्याच्या आकड्यांचा वापर करण्यात आला.
हे आकडे एका संक्रमित माकडाच्या संसर्गाच्या उच्च स्तराच्या दरम्यान त्याच्या विविध टिश्यू (उती) मधील सार्स-कोव्ह-2 च्या कणांच्या बरोबरीने होते.

या अवयवांच्या टिश्यूंचे घेतले नमूने
हे आकडे काढण्यासाठी स्टडीत संक्रमित माकडांच्या त्या शारीरीक भागांना जसे की फुफ्फुस, टॉन्सिल्स, लिंफ नोड्स पचनप्रणालीच्या टिश्यूचे नमून घेण्यात आले होते.
या भागांना कोरोना व्हायरस अतिशय प्रभावित करतो.

एका व्हायरसचे द्रव्यमान इतके आहे..
माकडांच्या टिश्यूमध्ये प्रति ग्रॅम असलेल्या वायरसच्या कणांना मनुष्याच्या टिश्यूच्या द्रव्यमानाने गुणकार करण्यात आला आणि परिणाम मिळवण्यात आले.
मागील गणनांपूर्वीच कोरोना व्हायरसच्या डायामीटरच्य बाबत शोध लावण्यात आला आहे.
ज्यानुसार व्हायरसच्या प्रत्येक कणाचे द्रव्यमान सुमारे 1फेम्टोग्रॅम आहे.

एका संक्रमितांमध्ये कोरोनाचे किती वजन :
कोरोना व्हायरसचा व्यास आणि संक्रमित व्यक्तीमध्ये संसर्गाच्या उच्च स्तरादरम्यान असलेल्या व्हायरसच्या कणांच्या संख्येला आपसात मिळवल्यानंतर आढळून आले की,
एका संक्रमित व्यक्तीमध्ये 1 मायक्रोग्रॅम ते 10 मायक्रोग्रॅमपर्यंत कोरोना व्हायरसचे कण असू शकतात.
संशोधकांनुसार, एखादी संक्रमित व्यक्ती किंवा जगभरातील एकुण संक्रमित व्यक्तींमध्ये कोरोना व्हायरसच्या कणांचे वजन संसर्गाची गंभीरता आणि स्तरावर अवलंबून असू शकतो.

Modi Government | सुरक्षेत ‘आत्मनिर्भर’ होणार रेल्वे ! दोन ट्रेनची धडक रोखणार्‍या ‘स्वदेशी’ प्रणालीला सरकारची मंजूरी