‘चीन’ है कि मानता नहीं ! जगाला ‘कोरोना’चं ‘करंट’ देणारं चीन नाही सुधरणार, ‘वुहान’मध्ये पुन्हा वटवाघूळासह वन्य पाण्यांची विक्री सुरू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. चीनच्या वुहान प्रांतातून उद्भवलेल्या या विषाणूमुळे जगातील 190 पेक्षा अधिक देशांमध्ये विनाश होत आहे. त्याचवेळी चीनने या विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. पण तरीही चीन स्वस्थ बसत नाही, चीनच्या वुहान प्रांतात पुन्हा एकदा प्राण्यांच्या बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. या बाजारपेठांमध्ये कुत्रा, मांजर आणि वटवाघूळ चे मांस अंधाधुंध विकले जात आहे आणि तेही कोणत्याही संरक्षणाशिवाय विकण्यात येत आहे.

असे मानले जाते की तीन महिन्यांपूर्वी वुहानमधील अशाच मांस बाजारात मनुष्यामध्ये कोरोना विषाणू पसरला होता. या विषाणूने पांगोलिन पासून वटवाघुळाद्वारे मानवी शरीरात प्रवेश केला होता. चीन मधील वुहान मधून हा विषाणू इटलीमध्ये पोहोचला, आणि आता त्याने संपूर्ण युरोप काबीज केला आहे. अमेरिका देखील या विषाणूच्या जाळ्यात अडकले आहे. अमेरिकेचे न्यूयॉर्क हे आता नवीन वुहान होत आहे. अमेरिकेत सुमारे दीड लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत 33 हजार लोकांचा बळी गेला असून जागतिक अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये पोहोचली आहे.

मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत वटवाघूळ

चीनच्या बाजारामध्ये पुन्हा एकदा वटवाघूळांची विक्री केली जात आहे. वटवाघुळांच्या व्यतिरिक्त कुत्री, मांजरी, विंचू आणि इतर प्राण्यांचे मांस देखील विकले जात आहे. चीनमधील लॉकडाऊन हटवण्यात आलेले आहे. अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी चीन सरकार लोकांना बाजारात उतरण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून बाजारपेठ होती होती बंद

वुहानमधील प्राण्यांची बाजारपेठ गेल्या तीन महिन्यांपासून बंद होती. जानेवारीत त्यास बंद करण्यात आले होते. चीनच्या हुबेई प्रांताचे वुहान शहर 23 जानेवारीला लॉकडाऊन झाले. सर्व उड्डाणे, गाड्या, बस सेवा बंद करण्यात आल्या होत्या. महामार्गाकडे जाणारा रस्ताही बंद होता. सर्व शाळा, विद्यापीठे, व्यवसाय संस्था बंद होती. एका व्यक्तीला दर तीन दिवसांनी रेशनसाठी बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली होती. वयोवृद्ध आणि आजारी लोकांना त्यांच्या घरीच राहण्याची सूचना देण्यात आली होती. दरम्यान आता वुहानमध्ये पुन्हा जनजीवन सुस्थितीत येत आहे. वुहान आणि हुबेई येथील लोक गेल्या तीन महिन्यांपासून घरात कैद होते. आता तेथील बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे.