देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि आयुक्त राजीव कुमार यांना कोरोनाचा संसर्ग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या विळख्यात अनेक लोक अडकले आहेत. यामध्ये काही दिवसापूर्वी नियुक्ती झालेले भारताचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र या दोन्ही अधिकाऱ्याचे विधानसभा निवडणुकीबाबत कामकाज हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरु आहे.

काही राज्यात विधानसभा निवडणूक सुरु आहे. तर याचे नियंत्रण हे निवडणूक आयुक्तांवर असते. मात्र सध्या मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे कोरोनामुळे दोन्ही अधिकारी सध्या गृह विलगीकरणात आहेत. घरीच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर घरात राहूनच ते व्हिडिओच्या माध्यमातून वास्ताविक बैठकीत सहभागीही होत आहेत. व्हिडिओ कॉलच्याद्वारे ते इतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या संपर्कात सवांद साधत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पद सोडल्यानंतर सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी १३ एप्रिल रोजी आपला पदभार स्वीकारला. भारताचे २४ वे निवडणूक प्रमुख बनलेल्या चंद्रा यांची १४ फेब्रुवारी २०१९ रोजी निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. अशोक लवासा यांच्यासोबत ते त्यावर्षीच्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमातही सहभागी झाले होते.