Coronavirus in India | भारतातून ‘कोरोना’ कधी जाणार? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना बाधित (Coronavirus in India) रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी (दि.24) देशात 3 लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची (Coronavirus in India) नोंद झाली. तर 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी देशातील कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) कधी कमी होईल आणि राज्यांमधील कोरोनाच्या रुग्णांमध्ये कधी घट होईल याबाबतची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे.

 

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारीपासून भारतात कोरोना (Coronavirus in India) कमी होईल. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Preventive Vaccination) मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. देशातील 75 टक्के प्रौढ लोकांना लसीचे दोन डोस मिळाले आहेत. मात्र, केरळ येथील कोरोना टास्क फोर्सचे (Corona Task Force Kerala) सल्लागार डॉ. राजीव जयदेवन (Advisor Dr. Rajiv Jayadevan) यांनी सांगितले की, पुढील काही आठवड्यांत ओमायक्रॉनमुळे (Omycron) पसरलेली कोरोनाची तिसरी लाट लहान शहरे आणि गावांमध्ये वेगाने पसरेल.

महाराष्ट्र टास्क फोर्सचे (Corona Task Force Maharashtra) सदस्य डॉ. शशांक जोशी (Dr. Shashank Joshi) यांनी सांगितले की,
फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत भारतात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होईल आणि त्यानंतर कोरोनाची तिसरी लाट संपण्याची शक्यता आहे.
मार्चमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पूर्ण पणे कमी होईल. तसेच एप्रिलनंतर भारत कोरोना महामारीतून मुक्त होईल.
तिसरी लाट ज्या वेगाने आली तेवढ्याच वेगाने ती कमी होईल.

 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (Indian Institute of Science) आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या (Indian Statistical Institute)
संशोधकांच्या मते जानेवारीच्या अखेर किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला देशात रोज 10 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळतील.

 

Web Title :- Coronavirus in India | covid cases in the country to decline by feb 15 cases have started reducing in some states metro city

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya | किरीट सोमय्या थेट मंत्रालयात ! कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून केल्या फाईल्स चेक, चर्चेला उधाण

 

LIC Saral Pension Plan | एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदा प्रीमियम देऊन दरमहिना मिळवू शकता 12,000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या सविस्तर माहिती

 

Parbhani Crime | दुर्देवी ! शाळेत जाताना काळाने केला मोठा घात; ट्रकच्या धडकेत 3 भावडांचा मृत्यु