पुण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेना, आता मोकळ्या मैदानांवर होणार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णाचा मृत्यू होत असल्याने पुण्यात स्मशानभूमी देखील फुल झाल्या आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने आता मोकळ्या जागेत, मैदानामध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेळ आहे.

दैनंदिन कोरोना रुग्णाचा बळी जात आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात मृतदेह स्मशानभूमीत येत आहे. यामुळे स्मशानभूमी भरगच्च भरली आहे. आपल्या रुग्णाची अंत्यसंस्कार करण्यासाठी खूप वेळ नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. या कारणामुळे पुणे महानगरपालिकेने मोकळ्या मैदानात मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुण्यातील २१ स्मशानभूमीत सलग अंत्यसंस्कार होत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील लोखंडाच्या सळ्याही पिघळण्यास सुरुवात झाली आहे. स्मशानभूमीतील चिमण्याही खराब होत आहेत. त्याशिवाय ओव्हर हिटिंगही सुरू आहे. स्मशानभूमीत कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून अभियंत्यांची एक टीम तैनात करण्यात आली आहे. तसेच ४ अतिरिक्त विद्यूत दाहिन्या बनविण्यासाठी २४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. स्मशानभूमीत सलग अंत्यसंस्कार होत असल्याने शेवटी निर्जन आणि मोकळ्या जागांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

या दरम्यान, पुण्यात आतापर्यंत सहा हजार लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. म्हणून येथील सगळेच स्मशानभूमी भरले आहेत. असे येथील कैलास स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. पुण्यामधील २४ स्मशानभूमींमध्ये येणाऱ्या मृतदेहांचा आकडा वाढत आहे. म्हणून विद्यूत दाहिनींमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याच्याही घटना घडत आहेत. मागील काही दिवसात ११ हुन जास्त गॅस आणि विद्यूत दाहिंनींमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत. तसेच, पुण्यात दिवसाला १०० लोकांचा कोरोनाने बळी जात आहे. त्याव्यतिरिक्त १२० हून जास्त मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीत येत आहेत. रस्ते अपघात, नैसर्गिक मृत्यू आणि इतर आजारांमुळे होणारे हे मृत्यू आहेत, अशी माहिती पालिकेचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंडूल यांनी म्हटले आहे.