Covid Health Insurance Policy | कोरोना हेल्थ इन्शुरन्स घेत आहात तर वेटिंग पीरियडसह ‘या’ 10 गोष्टींकडे ठेवा लक्ष, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे भारतात 2.5 कोटीपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. अजूनही दररोज 60-65 रूग्ण मिळत आहेत. कोरोनाचा धोका आणि त्याचा महागडा उपचार पाहता लोक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी Covid Health Insurance Policy घेत आहेत. अशावेळी पॉलिसीच्या महत्वाच्या गोष्टी तपासून घेणे खुप आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार या महत्वाच्या गोष्टी जाणून घेवूयात…

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

1. कोविड हेल्थ इन्श्युरन्सचा वेटिंग पीरियड
कोविड हेल्थ इन्श्युरन्स Covid Health Insurance मध्ये वेटिंग पीरियड पॉलिसी खरेदी केल्यानंतर 7 दिवस ते 30 दिवसांच्या दरम्यान असतो. बहुतांश मोठ्या कंपन्या आरोग्य विम्यात कोविड कव्हरेजचा वेटिंग पीरियड 30 दिवसांचा आहे. पॉलिसी बाजारचे हेल्थ इन्श्युरन्सचे हेड अमित छाबडा यांचे म्हणणे आहे की सध्या प्रत्येक हेल्थ आणि टर्म लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कोविडसुद्धा कव्हर होतो, परंतु काही नियम-अटी वेगळ्या असू शकतात.

2. पीपीई किट इत्यादीचा खर्च…
कोविड रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल (Covid hospitalization) झाल्यानंतर पीपीई किट, ग्लव्हज, बेल्ट, थर्मामीटर, स्पायरोमीटर यासारख्या अनेक खर्चाचा समावेश असतो. मॅक्स बूपा, बजाज अलियांझ सारख्या कंपन्या सोडल्या तर बहुतांश कंपन्या हे खर्च हेल्थ कव्हरमध्ये देत नाहीत. पॉलिसी खरेदी करताना याकडे आवश्य लक्ष दिले पाहिजे. काही विमा कंपन्या रायडरसह या गोष्टी कव्हर करतात.

Pune News | आजचा दिवस हा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने ऐतिहासिक !

3. घरच्या उपचाराचा खर्च
कोरोनाच्या लाटेदरम्यान बहुतांश हॉस्पिटलमध्ये जागाच नव्हती, अशावेळी घरी केलेल्या उपचाराच्या खर्चावर (Domiciliary Hospitalization) विमा कंपनी कव्हर देते किंवा नाही, याकडे लक्ष द्या. म्हणजे जर होम आयसीयू किंवा सामान्य उपचाराची (Home Treatment) आवश्यकता असेल तर त्यावर क्लेम मिळतो.

4. कुलिंग ऑफ पीरियड
छाबडा यांच्यानुसार, जर तुम्हाला अगोदरच कोरोना संसर्ग झाला आहे,
तर तुम्हाला याच्याशी संबंधीत हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी घेण्यासाठी 6 महिने वाट पहावी लागेल.
बहुतांश कंपन्या कोविडमधून रिकव्हर झालेल्या रूग्णांसाठी सहा महिन्यांचा कुलिंग ऑफ पीरियड (Cooling off period For Covid) ठेवतात.
मात्र अजूनही कोरोना झालेला नसेल तर ताबडतोब पॉलिसी Covid Health Insurance Policy घेणे चांगले ठरू शकते.

5. विमा रक्कम (Sum Insured) सुद्धा महत्वाची
कोविड-19 मध्ये सामान्यपणे 10-15 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.
संक्रमित व्यक्तीच्या उपचाराचा खर्च 10 ते 15 लाख सुद्धा होऊ शकतो. अशावेळी जास्त विमा रक्कमेची पॉलिसी घेणे चांगले ठरते.
1 कोटीचा सम इन्श्युअर्डचा प्रीमियम प्रति महिना 400 रुपयांपर्यंत असतो, जो तुमची आर्थिक जोखीम कव्हर करतो.

6. रूमच्या भाड्याची मर्यादा
याचा संबंध हॉस्पिटलमधील रूमच्या भाड्याच्या मर्यादेशी (Room Rent Capping) आहे. कमीत कमी पॉलिसीमध्ये तुम्हाला सिंगल प्रायव्हेट एसी रूमची सुविधा आवश्य असावी.
अनेक प्लॅनमध्ये याच्या भाड्याची कोणतीही मर्यादा नसते, म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीने रूम निवडू शकता.

IRCTC iPay | झटपट बुक होते तिकिट आणि कॅन्सलेशननंतर मिनिटात मिळतो रिफंड, जाणून घ्या फीचर्स

7. Policy खरेदीची पद्धत
हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी मिनिटात ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते आणि काहीशी परवडणारी सुद्धा असते. 65 वर्षाच्या वयात जर एखाद्या व्यक्तीला कोणताही आजार नसेल तर ताबडतोब ऑनलाइन पॉलिसी मिळू शकते.
यामध्ये कोणत्याही मेडिकलची आवश्यकता नसते आणि ताबडतोब कव्हरेज सुरू होते.

8. वय आणि आजारांचा विचार करा
जर तुम्ही 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहात आणि डायबिटीज,
हायपरटेंशन सारख्या आजारांनी अगोदरपासूनच ग्रस्त (Pre Existing Illness) आहात तरी सुद्धा ऑनलाइन पॉलिसी (Online Health Insurance) खरेेदी करू शकता,
त्यामध्ये सुद्धा मेडिकल चेकअप (Medical Checkup) ची आवश्यकता नसते, तुम्हाला फोनवरच अंडररायटिंग द्यावे लागेल.

9. पोस्ट कोविड लक्षणांचे कव्हर आवश्यक
कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर लोक पोस्ट कोविड लक्षणांचा (Post Covid Illness) सामना करत आहेत.
अशावेळी जास्त विमित रक्कमेची कॉम्प्रेव्हसिंग इन्श्युअर्ड पॉलिसी घेणे चांगले असते.
आता ती परवडणार्‍या दरात मिळू शकते. पॉलिसी घेताना लक्ष द्या की प्लॅनमध्ये पोस्ट कोविडशी संबंधीत बहुतांश लक्षणे कव्हर होतात किंवा नाही.

10. कॉर्पोरेट कव्हर रपोरेट कव्हर पुरेसे नाही
पगारदार (सॅलरीड) कर्मचार्‍यांना कॉर्पोरेट हेल्थ इन्श्युरन्स (Corporate Health Insurance) उपलब्ध होतो, परंतु त्यांची विमा रक्कम खुप कमी असते. तर कोविड आणि कोविडनंतरच्या समस्यांसाठी चांगली सम इन्श्युर्डच्या पॉलिसीची आवश्यकता असते. म्हणून वेगळे हेल्थ कव्हर घेणे चांगले ठरते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : covid health insurance policy if you are taking health insurance related to corona then keep these 10 things in mind including waiting period

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Unlock | पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनलॉकचे सुधारित आदेश जारी, जाणून घ्या काय बंद अन् काय सुरू

Ransom Case | खंडणी प्रकरण ! ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केलेल्या ‘त्या’ बडतर्फ पोलिसाचा जामीन फेटाळला