Covid Jab | बिहारमध्ये PM मोदी-सोनिया-प्रियंकाने घेतला कोरोनाचा डोस! आरोग्य विभागाचा अजब खेळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Covid Jab | एकीकडे कोरोनापासून बचावासाठी देशभरात जास्तीत जास्त कोरोना व्हॅक्सीनेशनवर (Corona Vaccination) फोकस केला जात आहे, तर दुसरीकडे बिहार (Bihar) मध्ये व्हॅक्सीनेशनच्या नावावर फ्रॉडचा अजब खेळ समोर आला आहे. येथील अरवल (Arwal) जिल्ह्यातील करपी कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या लसीकरण पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या यादीत काही नावे अशी समोर आली आहेत, जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. (Covid Jab)

 

बनावट एंट्री घोटाळा
जिल्ह्याच्या करपी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-19 व्हॅक्सीनेशन आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट किटने चाचणीच्या नावावर शेकडो लोकांची नावे बनावट पद्धतीने डाटामध्ये एंटर केली आहेत. याच वर्षी 27 ऑक्टोबरला आरटी-पीसीआर आणि व्हॅक्सीनेशनच्या नावावर अनेक मोठ्या राजकीय व्यक्ती आणि अभिनेते, अभिनेत्रींची नावे या यादीत लिहिण्यात आली आहेत. (Covid Jab)

सरकारी कागदपत्रांनुसार, याच दिवशी येथील सेंटरवर एकाचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), अमित शाह, सोनिया गांधी यांनी व्हॅक्सीन घेतल्याची नोंद आहे. तर चित्रपट कलावंतांध्ये प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आणि इतर नावे व्हॅक्सीनेशन पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत.

 

चौकशीचे आदेश दिले
सध्या या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर आरोग्य विभागाचे अधिकारी काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.
तसेच जिल्हा पदाधिकार्‍यांकडे सुद्धा कोणतेही उत्तर नाही. या दरम्यान शहराच्या डीएमने म्हटले की, चौकशीनंतर एफआयआर दाखल करू.
दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी आरोग्य मंत्र्यांसह सरकारला धारेवर धरले आहे.

 

Web Title :- Covid Jab | pm modi amit shah priyanka chopra on bihar covid jab list in glaring data fraud with sonia gandhi name also

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | 27 वर्षीय IT इंजिनिअर प्रियकरानं 29 वर्षीय संगणक अभियंता प्रेयसीला घातली ‘गळ’, म्हणाला – ‘आपण लग्न करणार आहोत, तू तुझा न्युड व्हिडीओ पाठवं’, Video सेंड केल्यानंतर घडलं भलतच ‘कांड’

Anti Corruption Bureau Pune | 50 हजाराचे लाच प्रकरण ! पुणे अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं बारामती सेशन कोर्टातील पोलिसाला घेतलं ताब्यात

Nagar Urban Co-Op Bank | रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवर घातले निर्बंध; खातेदारांना केवळ 10 हजार रुपये काढता येणार

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! 10 वा हप्ता मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मोदी सरकारकडून जारी; जाणून घ्या