होय ! अवघ्या 29 वर्षांत ‘तो’ बनला 35 मुलांचा बाप; कसा काय तर जाणून घ्या

लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे बहुतांश बाबी ऑनलाईन झाल्या आहेत. अनेक व्यवहार ऑनलाईन झाल्यानंतर बरेचसे व्यवसायही चांगले चालत आहेत. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसच्या स्पर्म डोनर केली गॉर्डी याचाही व्यवसाय कोरोनानंतर ऑनलाईन माध्यमातून मोठ्या प्रमाणात चालत आहे. गार्डी याने ब्रिटिश टीव्ही स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत यावर सविस्तर माहिती दिली.

केली गार्डी हा स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून अवघ्या 29 वर्षांत 35 मुलांचा बाप बनला आहे. गार्डी याने सांगितले, की कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे मी चांगलाच चिंतेत होतो. कारण जगभरातून महिला संपर्क करत होत्या. गॉर्डी लॉस लॉस एंजेलिसच्या कंपनीत पार्ट टाईम अकाउंटंट आहे. तो दोन फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून स्पर्म (वीर्य) शोधणाऱ्या लोकांची मदत करतो. त्याने दोन फेसबुक ग्रुप बनवले आहेत. एक अमेरिकेतील लोकांसाठी तर दुसरा जगभरातील लोकांसाठी. गॉर्डी हा कधीतरी त्याच्या फिमेल क्लाइंटशी भेटण्यासाठीही जातो. त्याने 22 वर्षांपासून स्पर्म डोनेट करण्याचे काम सुरु केले आहे.

स्पर्मच्या बदल्यात घेत नाही पैसे
90 टक्के क्लाइंट आर्टिफिशल इनसेमिनेशनच्या माध्यमातून स्पर्म घेतात. तर काही महिला सेक्सच्या मदतीने स्पर्म घेतात. स्पर्म डोनेशनची पद्धत कशी असेल हे क्लाइंट स्वत: ठरवतात. गॉडीने सांगितले, की तो स्पर्म देण्याच्या बदल्यात पैसे घेत नाही. मात्र, त्याच्या प्रवासाचा सर्व खर्च त्याचे क्लाइंट्स उचलतात. मी एक डिल म्हणून याकडे पाहतो. मला फ्री ट्रिप मिळते. तसेच गरजूंना त्यांचे बाळ मिळते. त्यामुळे दोघेही खूश असतात, असेही गॉर्डी म्हणाला.