कोरोनाबाधित विद्यार्थ्याला हॉस्पीटलमध्ये परीक्षेची तयारी करताना पाहून IAS अधिकारी झाले ‘स्तब्ध’, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाने अगदी लहान मुलांसापासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांच कवेत घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान या संकटामुळे अनेक विद्यार्थ्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. सोशल मीडियावर अशाच ओडिसाच्या विद्यार्थ्याचा अभ्यास करतानाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित असतानाही हा तरूण रुग्णालयात परिक्षेची तयारी करताना दिसत आहे. सीएच्या परीक्षेची तयारी करत असल्याचे या तरुणांने सांगितले. तरुणाच्या बेडवर कॅल्यूलेटर, पुस्तक दिसून येत आहे. पीपीई किट घालून तिघे त्याच्या समोर उभे असल्याचे फोटोत दिसत आहे. आतापर्यंत या फोटोला 31 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

गंजम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय कुलंगे यांनी बेरहमपूरच्या एमकेसीजी मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला आहे. कुलंगे यांनी ट्विटरवर हे चित्र शेअर केले आणि रुग्णाचे कौतुक केले. जिल्हाधिकाऱ्यांनी लिहले आहे की, यश हा योगायोग नाही. आपण सपर्मण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मी कोविड सेंटरमध्ये गेलो आणि ही व्यक्ती परीक्षेचा अभ्यास करत होती. आपले समर्पण आपल्याला आपल्या वेदना विसरायला लावते. त्यानंतर यश केवळ औपचारिकता असल्याचे ते म्हणाले