ऑक्सीजन सपोर्टवरील कोरोना रूग्णांमध्ये वाढू शकतो मेंदूचा आजार, स्टडीमध्ये आले समोर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – oxygen  कोविड-19 चा व्हायरस केवळ श्वासाचीच समस्या गंभीर करत नसून मेंदूवर सुद्धा याचा परिणाम होतो. न्यूरोलॉजिस्टने सांगितले की, यामुळे मेंदूमध्ये ग्रे मॅटर कमी होतो जे खुप धोकादायक असते. जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ताप आणि ऑक्सीजन (oxygen ) थेरेपीवाल्या गंभीर कोविड-19 रूग्णांवर संशोधन केले तेव्हा त्यांना त्यांच्या मेंदूत ग्रे मॅटरची कमतरता आढळून आली. हे संशोधन न्यूरो बॉयोलॉजी ऑफ स्ट्रेस नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तामध्ये न्यूरोलॉजिस्टच्या संदर्भाने म्हटले आहे की, कोविड-19 च्या गंभीर प्रकरणांतील असे रूग्ण ज्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल राहण्यासाठी ऑक्सीजन किंवा व्हेंटिलेटर सपोर्टची गरज असते त्यांच्यात न्यूरोलॉजिकल लक्षणे विकसित होण्याचा धोका जास्त असतो.

काय आहे हे ग्रे मॅटर ?
ग्रे मॅटर आपल्या मेंदूमध्ये माहिती प्रक्रियेसाठी खुप महत्वाचे आहे. याच्यामुळे व्यक्ती स्मृती आणि भावना नियंत्रित करू शकते. ग्रे मॅटरच्या कमतरतेमुळे न्यूरॉन्स आणि संप्रेषणाच्या कामावर परिणाम होऊ शकतो.

अशाप्रकारची लक्षणे त्या रूग्णांमध्ये जास्त मिळू शकतात जे अगोदरपासून मेंदूचा आजर, हाय ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणासारख्या आजाराने ग्रस्त आहेत. मेंदूमध्ये कमी ग्रे पदार्थाच्या मात्रेचा कोविड -19 रूग्णांचा उच्च स्तराच्या अपंगत्वाशी संबंध जोडला जातो.

हे देखील वाचा

‘महाविकास’मध्ये ‘तणाव’; राष्ट्रवादीचं मिशन 2024 तर काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Burglary in Pune | आंबेगाव पठार परिसरात भरदिवसा घरफोडी; 10 लाखाचा ऐवज लंपास

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो कंटेनरचा अपघातात एकाचा मृत्यू

धक्कादायक ! झोपेत असलेल्या मुलीची आईनेच केली हत्या; सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : covid patient with oxygen support may reduce gray matter in brain