दिलासादायक ! 97 वर्षीय आजीनं कोरोनाला हरवलं; ठणठणीत होऊन जन्मदिनीच पोहोचल्या घरी

इंदूर/ मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – कोरोनाने देशात विक्रमी आकडा गाठला असतानाच लोक हैराण झाले आहेत. मात्र इंदूर येथील एक दिलासादायक बातमी समोर आलीय. एका ९७ वर्षीय आजीने कोरोनाला हरवलं आहे. शांताबाई दुबे असे त्या आजीचे नाव आहे. त्या आजीच्या फुफुसापर्यंत अधिक संसर्ग गेला होता. तरीही त्या आजीनं हार मानली नाही. रामनवमी दिवशी त्या बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. मुख्यतः म्हणजे त्याच दिवशी त्याचा जन्म दिन होता. जन्मदिनीच त्यांनी कोरोनावर मत करून घरी सुखरूप पोहचल्या आहेत.

अधिक माहितीनुसार, मूळच्या उज्जैन मधील आजीचा ४ एप्रिलला रक्तदाब वाढला, त्यांना उज्जैनमध्ये रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने ७ एप्रिलला चाचणी करून घेतली, त्याच दिवशी सिटीस्कॅननही केले, तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना ८ एप्रिलला इंदूरच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना रुग्णालयात ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. या इतक्या वयात आत्मविश्वासाच्या जोरावर आजीने कोरोनाला हरवलं आहे.

या दरम्यान, गेल्या वर्षी एका १०१ वर्षीय वृद्धाने कोरोनावर मत केली होती. त्यादरम्यान ते भारतातील सर्वाधित वृद्ध कोरोनाबाधित होते. पोटदुखीच्या कारणाने ते रुग्णालयात दाखल झाले होते, तपासणी केल्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ते गृह विलगीकरणात होते.