Covid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात 2726 रूग्णांचा झाला मृत्यू

नवी दिल्ली :वृत्त संस्था – Covid Update | देशात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा वेग कमी झाला आहे. मागील 24 तासात देशभरात 60 हजार 471 नवीन कोरोना संक्रमित आढळले आहेत. हा आकडा मागील 76 दिवसातील सर्वात कमी आहे. मागील 24 तासात 2 हजार 726 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 1 लाख 17 हजार 525 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनामुळे 2 कोटी 95 लाख 70 हजार 881 लोक संक्रमित झाले आहेत. यापैकी 2 कोटी 82 लाख 80 हजार 472 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 77 हजार 31 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 9 लाख 13 हजार 378 अ‍ॅक्टिव्ह केस आहे.

प्रमुख राज्यांची स्थिती

महाराष्ट्र
येथे सोमवारी 8,129 लोक संक्रमित आढळले. 14,732 लोक बरे झाले आणि 1,592 लोकांचा मृत्यू झाला. येथे आतापर्यंत 59.17 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. यामध्ये 56.54 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1.12 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1.47 लाख रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेश
नवीन रूग्ण 313
मृत्यू 72

मध्य प्रदेश
नवीन रूग्ण 242
मृत्यू 36

दिल्ली
नवीन रूग्ण 131
मृत्यू 16

पश्चिम बंगाल
नवीन रूग्ण 3,984
मृत्यू 84

बिहार
नवीन रूग्ण 324
मृत्यू 13
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : apps google introduced the facility to hide photos in this way hide your personal photos and videos from others tech news amdm

हे देखील वाचा

कोण आहेत सुल्तान अन्सारी ज्यांनी दहा मिनिटात राम मंदिर ट्रस्टकडून कमावले साडे 16 कोटी; जाणून घ्या

आता मुंबईत झाडांवर होणार ‘उपचार’, BMC ने नियुक्त केला ’डॉक्टर’; देशात पहिल्यांदा झाले असे

व्हॅक्सीनेशनसाठी आहात अस्वस्थ, आता Paytm वरून बुक होईल व्हॅक्सीन घेण्यासाठी स्लॉट; जाणून घ्या

15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल पैसा, इतरांसाठी असा आहे मंगळवार