Covid Vaccination | लसीकरणासाठी मोबाइल फोन, पत्त्याचा पुरावा आवश्यक नाही; केंद्रावर ’ऑन-साईट’ नोंदणीची सुविधा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था (policenama online) – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले की, कोरोना लसीकरणासाठी (Covid Vaccination) मोबाइल फोन असणे आवश्यक नाही. तसेच पत्त्याचा पुरावा सुद्धा अनिवार्य नाही. लस घेण्यासाठी ’को-विन’ पोर्टलवर अगोदर ऑनलाइन नोंदणी करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. मंत्रालयाने एक वक्तव्य जारी करून ते वृत्त फेटाळले आहे ज्यामध्ये आरोप केला आहे की, तांत्रिक गरजा पूर्ण करू न शकल्याने बेघर लोकांना कोरोना लसीकरण (covid vaccination registration) नोंदणीपासून रोखले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

वृत्तात हे सुद्धा म्हटले आहे की, डिजिटल प्रकारे नोंदणी करण्याची आवश्यकता, इंग्रजीची माहिती आणि सुविधेसह स्मार्टफोन किंवा कम्प्युटर वापर, हे असे काही कारक आहेत जे लोकांना लसीकरणापासून वंचित ठेवत आहेत. हे दावे आधारहीन असल्याचे सांगत मंत्रालयाने म्हटले की, ज्या लोकांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोन किंवा मोबाइल फोन सुद्धा नाही, त्यांच्यासाठी सुद्धा सरकारी केंद्रावर मोफत ’ऑन-साईट’ नोंदणी आणि लसीकरण उपलब्ध आहे. मंत्रालयाने दावा केला की, आतापर्यंत दिलेले 80 टक्के डोस अशाप्रकारेच दिले आहेत.

को-विन 12 भाषांमध्ये उपलब्ध
वक्तव्यात म्हटले आहे की, लोकांच्या सुविधेसाठी को-विन प्लॅटफार्म आता 12 भाषांमध्ये -हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगु, कन्नड़, मराठी, गुजराती, ओडिया, बांगला, असामी, गुरुमुखी (पंजाबी) आणि इंग्रजीत उपलब्ध आहे.

मंत्रालयाने म्हटले, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र.
फोटो युक्त रेशन कार्ड, (Aadhar Card, Voter Identity Card, Ration card) दिव्यांग ओळखपत्रासह नऊ ओळखपत्रांपैकी एक लसीकरणासाठी आवश्यक आहे.
ज्यांच्याकडे कोणतीही ओळख नाही अशांसाठी तरतूद केली असून अशा दोन लाख लोकांना लसीकरण केले आहे.
आकड्यांवरून हे सुद्धा समजले की, 70 टक्केपेक्षा जास्त लसीकरण केंद्र ग्रामीण भागात आहेत.

Web Title :- Covid Vaccination | health ministry dismisses reports of homeless being excluded from vaccination

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर