Covid vaccination : व्हॅक्सीन घेण्यापूर्वी आणि नंतर करू नयेत ‘ही’ कामे, जाणून घ्या युनिसेफची गाईडलाईन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत असताना आता सर्वांना व्हॅक्सीनकडूनच आशा आहे. याच कारणामुळे सरकारने आता 1 मेपासून 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना व्हॅक्सीन देण्यास मंजूरी दिली आहे. व्हॅक्सीनबाबत लोकांच्या मनात अजूनही अनेक शंका आहेत. युनिसेफच्या हेल्थ एक्सपर्टने सांगितले की, व्हॅक्सीन घेण्यापूर्वी आणि व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेवूयात याबाबत…

व्हॅक्सीन घेण्यापूर्वी…
* थोडा स्वताकडून रिसर्च करा. कोणती व्हॅक्सीन कसे काम करते, त्यांच्यातील फरक, कुणी व्हॅक्सीन घेऊ नये, यासाठी आरोग्य मंत्रालय, डब्ल्यूएचओ किंवा युनीसेफसारख्या विश्वसनीय स्त्रोतांवरच विश्वास ठेवा.
* व्हॅक्सीन सेंटरवर मास्क घालून जा.
* सोबत सॅनेटायजर, अपॉईंटमेंट नोटिफिकेशन आणि आयडी प्रूफ सोबत ठेवा.
* सेंटरवर ढिले कपडे घालून जा.
* कोणते औषध घेत असाल तर व्हॅक्सीन देणार्‍या कर्मचार्‍याला पूर्ण माहिती द्या.
* कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर सध्या व्हॅक्सीन घेणे रद्द करा. तसे सेंटरला कळवा.
* उपचारानंतर 14 दिवसांनी लक्षणे बंद झाल्यावर व्हॅक्सीनचा विचार करू शकता.
* व्हॅक्सीन सेंटरवर कुठेही स्पर्श झाल्यास सॅनेटायझर वापरा.

व्हॅक्सीन घेतल्यानंतर हे लक्षात ठेवा…
* व्हॅक्सीन घेतल्यानंतर काही साइड इफेक्ट दिसणे नॉर्मल आहे. बॉडी इम्यून प्रोटेक्शन काम करत असल्याचे हे संकेत आहेत. व्हॅक्सीन घेतल्याच्या ठिकाणी वेदना, सूज, लाल होणे, थंडी लागणे किंवा हलका ताप, थकवा, डोकेदुखी, सांधे आणि मासपेशी वेदना ही हे सामान्य साइड इफेक्ट आहेत. ते आपोआप बरे होतात.

* गंभीर साईड इफेक्ट होत असल्यास हेल्थ केयर वर्करला ताबडतोब सांगा. हे साईड इफेक्ट दिसण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ लागू शकतो. यासाठी व्हॅक्सीनेशन सेंटरवर थांबा. ज्यास ऑब्जर्वेशन पीरियड म्हणतात.

* व्हॅक्सीनचा दुसरा डोस आठवणीने घ्या.

* घरी गेल्यानंतर डाएटमध्ये जास्तीत जास्त लिक्विड घ्या. वेदना होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासिटामोल औषध घ्या. व्हॅक्सीनच्या ठिकाणी वेदना होत असतील तर त्या ठिकाणी थंड पट्टी ठेवा.

* व्हॅक्सीन घेतल्यावर सुद्धा हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, मास्क घालणे, डिस्टन्सिंगचे पालन करा.