ब्रिटिश डॉक्टर म्हणाले – ‘कोरोना व्हॅक्सीनसाठी 10 ते 20 लाखांपर्यंत वसूल करू शकतात प्रायव्हेट क्लिनिक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ब्रिटनमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी व्हॅक्सीनेशन सुरू झाले आहे. परंतु पहिल्या फेजमध्ये त्यांनाच व्हॅक्सीन दिली जात आहे, ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. यामध्ये हॉस्पिटल स्टाफ आणि ज्येष्ठांचा सहभाग आहे. परंतु आता श्रीमंत लोक नियम तोडून व्हॅक्सीन घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

express.co.uk च्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये अनेक श्रीमंत लोक प्रायव्हेट क्लिनिकशी संपर्क करत आहेत आणि कोरोना व्हॅक्सीनच्या डोससाठी अनेक लाख रुपये मोजण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. ब्रिटनच्या चेशायरमध्ये प्रायव्हेट क्लिनिक चालवणारे डॉ. रोशन रविंद्रन यांनी सांगितले की, श्रीमंत माणसे सरकारने बनवलेली लाईन तोडून व्हॅक्सीन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सध्या ब्रिटनमध्ये केवळ नॅशनल हेल्थ सर्व्हिस हॉस्पिटलमध्येच व्हॅक्सीन दिली जात आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत केवळ फायजरच्या व्हॅक्सीनलाच मंजूरी मिळाली आहे. मात्र, अमेरिकेत फायजरच्या सोबतच मॉडर्नाच्या व्हॅक्सीनला सुद्धा मंजूरी मिळाली आहे. येत्या काही दिवसात ऑक्सफोर्डच्या व्हॅकसीनला सुद्धा ब्रिटनमध्ये मंजूरी दिली जाऊ शकते.

तर, प्रायव्हेट क्लिनिक चालवणारे डॉ. रोशन रविंद्रन यांनी म्हटले की, विेशेषकरून असे लोक पैसे देऊन लस घेण्यास तयार आहेत ज्यांच्या एखाद्या नातेवाईकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. रविंद्रन यांनी हे सुद्धा सांगितले की, सध्या सर्व व्हॅक्सीनची खरेदी सरकारनेच केली आहे. परंतु, आशा आहे की, एप्रिलपासून प्रायव्हेट क्लिनिकला सुद्धा व्हॅक्सीनचा सप्लाय होऊ लागेल. आणि तेव्हा लोक पैसे देऊन व्हॅक्सीन घेऊ शकतील.

डॉ. रविंद्रन यांनी हे सुद्धा सांगितले की, येत्या काळात काही प्रायव्हेट क्लिनिक व्हॅक्सीनसाठी 10 लाख ते 20 लाख रुपये प्रति डोसपर्यंत पैसे वसूल करू शकतात. तर, ब्रिटन सरकारच्या मंत्र्याने संकेत दिले आहेत की, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनकाच्या कोरोना व्हॅक्सीनला सोमवारी मंजूरी मिळू शकते. एस्ट्राजेनकाचे सीईओ पास्कल सोरिअट यांनी दावा केला होता की, त्यांची व्हॅक्सीन फायजर आणि मॉडर्नाच्या बरोबरीने प्रभावी आहे.