Covid Vaccines | कोविड व्हॅक्सीनने प्रजनन क्षमता प्रभावित होते का, वंध्यत्व येते का? केंद्र सरकारने केले स्पष्ट; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी त्या अफवा फेटाळल्या, ज्यामध्ये म्हटले जात आहे की, कोविड व्हॅक्सीनमुळे (Covid Vaccines) वंधत्व येते. मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले की, कोविड व्हॅक्सीनमुळे वंध्यत्व येत नाही. भारतात लवकरात लवकर सहा वेगवेगळ्या प्रकारचे कोविड -19 (Covid-19) चे डोस उपलब्ध होतील. ज्यानंतर एका महिन्यात 30-35 कोटी डोस खरेदी करण्याची अपेक्षा आहे, जेणेकरून एका दिवसात 1 कोटी लोकांना लस (Vaccine) देता येऊ शकते. covid vaccines do not cause infertility health ministry dispels rumours

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

राष्ट्रीय लसीकरण (Vaccination) सर्वेक्षण गटाच्या (एटीएजीआय) कोविड-19 कार्यकारी गटाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र कुमार अरोरा (Dr. Narendra Kumar Arora) यांनी म्हटले, जेव्हा पोलिओ व्हॅक्सीन आली होती आणि भारत तसेच जगातील इतर भागात दिली जात होती, त्यावेळी सुद्धा अशा अफवा पसरल्या होत्या की, ज्या मुलांना पोलिओ डोस दिला जात आहे, भविष्यात अशा लोकांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

अँटी-व्हॅक्सीन लॉबी पसरवते चुकीची माहिती
त्यांनी म्हटले की, अशाप्रकारची चुकीची माहिती अँटी-व्हॅक्सीन लॉबी पसरवते. सर्व व्हॅक्सीन कठोर शास्त्रीय संशोधनातून गेल्या आहेत. कोणत्याही व्हॅक्सीनमुळे असा वाईट परिणाम होत नाही. मी सर्वांना विश्वास देतो की, असा वाईट प्रचार लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतो. आपले मुख्य लक्ष्य कोरोना पासून आपला देश वाचवण्याचे आहे.

Web Title :-  covid vaccines do not cause infertility health ministry dispels rumours

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

हे देखील वाचा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या ‘या’ 7 मागण्या होणार पुर्ण? महागाई भत्त्याचा देखील समावेश, जाणून घ्या

Pune Curfew | राज्यात डेल्टा+ व्हेरिएंटनं प्रचंड खळबळ ! पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी, जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

Delta Plus variant । ‘डेल्टा व्हेरिएंट’ कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO ने दिला इशारा (व्हिडीओ)