Video : उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान, म्हणाले – ‘इतर लोकांप्रमाणे कोरोनालाही जगण्याचा अधिकार’

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचे संकट गडद होत असताना नेत्यांकडून योगा करण्याचा, गोमूत्र, शेण लावण्याचा सल्ला देण्यात येत आहे. या घटना ताज्या असतानाच आता उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोरोना विषाणू एक जीव असून त्यालाही इतर लोकांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे, असे म्हंटले आहे. यावरून सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांनी रावत यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

या मुलाखतीत ते म्हणतात कि, कोरोना विषाणू एक जीव असून त्यालाही इतर लोकांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. मात्र आम्ही मानव स्वत:ला बुद्धीमान समजतो आणि त्याला संपविण्यासाठी तयार आहोत. यामुळे कोरोना स्वत:ला सतत बदलत आहे.मानवाला सुरक्षित राहण्यासाठी कोरोना विषाणूच्या पुढे जाण्याची गरज आहे. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडालीच पण त्रिवेंद्र सिंह रावत यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 

 

 

 

 

कोरोनाचे संकट गडद होत आहे. रुग्णांना औषोधोपचार मिळेनासे झाले आहे अशातच नेत्यांकडून बेभानपणे वक्तव्ये करण्यात येत आहे. त्यामुळे यावर अनेकांकडून खेद व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेस नेते गौरव पंधी यांनी रावत यांच्या या वक्तव्यावरून टिप्पणी केली असून ते म्हणाले कोणालाही आश्चर्य वाटू नये, कारण आपला देश आज जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित संकट झेलत आहे. तर सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टमध्ये कोरोना व्हायरस जीवाला आश्रय दिला जावा, असे एका युजरने म्हणत चपराक लगावली. अन्य एका युजरने तर कोरोना विषाणू हा जर प्राणी असेल तर त्याचे आधार, रेशन कार्डदेखील असेल? असा टोला लगावला आहे