‘कोरोना’ व्हायरसनं संक्रमित झालेले ‘ब्रिटिश’चे PM बोरिस जॉनसन यांची ‘प्रकृती’ बिघडली, ICU मध्ये दाखल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणू बाधित ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती खालावली आहे. काल त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा त्यांना रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये हलविण्यात आले. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांना नियमित चाचण्यांसाठी रुग्णालयात नेले जात असल्याची माहिती मिळाली होती पण तिथे त्यांची तब्येत आणखी बिगडली. त्यामळे त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले आहे.

10 दिवसांपूर्वी बोरिस जॉन्सन हे कोरोनाग्रस्त असल्याची पुष्टी झाली होती, त्यानंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानावर अलग ठेवण्यात आले होते. बोरिस जॉन्सन तेथूनच आपले काम करीत असत, परंतु तब्येत खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणि नंतर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान जॉन्सनची गर्भवती मंगेतर कॅरी सायमंड्स मध्ये देखील कोरोना विषाणूची चिन्हे दिसली आहेत, त्यानंतर त्यांनी देखील स्वत:ला सेल्फ-आयसोलेशन मध्ये ठेवले आहे.

जॉन्सन यांच्या अनुपस्थितीत आता परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब हे त्यांचे कामकाज पाहणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बोरिस जॉन्सन यांना लवकरच बरे व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की विश्रांती घ्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन, मला आशा आहे की लवकरच तुम्ही रुग्णालयातून बाहेर पडणार आणि बरे होणार.