Covid-19 Protocol | सणासुदीचे दिवस पाहता केंद्र सरकार सतर्क ! देशभरात 30 सप्टेंबरपर्यंत वाढवला कोरोना ‘प्रोटोकॉल’चा कालावधी

नवी दिल्ली : Covid-19 Protocol | कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेले सर्व उपाय पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत जारी राहतील. केंद्राने देशभरात कोविड-19 प्रोटोकॉल (Covid-19 Protocol) पालनातील कमतरतेबाबत सावध केले आहे आणि यावर जोर दिला आहे की, ज्या परिसरात संसर्गाची प्रकरणे कमी आहे, तिथे सुरक्षेच्या दृष्टीने नियमितपणे मॉनिटरिंग जारी राहावे.

राज्यांना कोविड प्रोटोकॉल पालनाचे निर्देश

याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून (MHA) शनिवारी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली. यामध्ये देशभरातील राज्यांना कोविड प्रोटोकॉल संबंधित आवश्यक निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे.

सणासुदीच्या काळाबाबत केंद्राने केले सावध

येणारा सणासुदीचा काळ पाहता केंद्राने राज्यांना सतर्क करत स्थानिक प्रतिबंध लागू करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून कोरोना संसर्ग पसरण्यापासून रोखता यावा. देशभरात जारी कोविड-19 मार्गदर्शक तत्व एक महिना वाढवत केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी आज म्हटले की, काही राज्य सोडून राष्ट्रीय स्तरावर महामारीची प्रकरणे कमी आहेत.

इशारादायक संकेत ओळखणे महत्वाचे

भल्ला यांनी 25 एप्रिल आणि 28 जूनला जारी केलेल्या अ‍ॅडव्हायजरीचा उल्लेख केला आणि म्हटले, संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रकरणांमध्ये वाढीसह इशारादायक संकेत ओळखणे महत्वाचे आहे. जेणेकरून यास रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलता येऊ शकतात.

कोविड प्रोटोकॉलचा सक्तीने व्हावे पालन

गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना, येणार्‍या सणाच्या काळात सतर्क राहण्यास सांगितले आहे. मंत्रालयाकडून जारी मार्गदर्शक तत्वामध्ये म्हटले आहे की, सणाच्या दरम्यान जास्त गर्दी होऊ नये याकडे लक्ष ठेवावे आणि पाच धोरणे – टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, व्हॅक्सीनेशन आणि कोविडसाठी आवश्यक वर्तनावर फोकस जारी ठेवावा. याशिवाय ज्या भागात संसर्ग कमी आहे तिथे सुरक्षेसाठी टेस्टिंग आणि मॉनिटरिंग जारी ठेवावे.

सर्व प्रोटोकॉल 30 सप्टेंबरपर्यंत जारी

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून (MHA) शनिवारी जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार आता कोविड-19 संबंधित सर्व प्रोटोकॉल 30 सप्टेंबरपर्यंत जारी राहतील.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार आज सकाळी नोंदलेले आकडे सांगतात की, 24 तासात देशात एकुण 46,759 नवी प्रकरणे समोर आली आहेत,
जी जवळपास दोन महिन्यातील सर्वात जास्त आहेत.

जागतिक प्रकरणे वाढून 21.45 कोटी

अमेरिकेच्या जॉन्स हापकिन्स युनिव्हर्सिटने सांगितले की, Covid-19 च्या जागतिक प्रकरणे वाढून 21.45 कोटी झाली आहेत आणि या महामारीने मरणार्‍यांची संख्या वाढून 44.8 लाख झाली आहे.
तर आतापर्यंत एकुण 5.12 अरब लोकांना व्हॅक्सीनेशन झाले आहे.

Ajit Pawar | बारामती दौऱ्यावर असताना अजितदादांनी घेतली चक्क इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल (व्हिडीओ)

Sandeep Pawar Murder Case | नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणात पुण्यातील गँगस्टर सुनिल वाघ पोलिसांच्या जाळ्यात; आतापर्यंत 24 जणांना अटक

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page
and Twitter for every update

Pune Gang Rape Case | धक्कादायक ! पुण्याच्या दत्तवाडीत 25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार, प्रचंड खळबळ

Govt Yojana | जर तुमच्या मोबाइलमध्ये सुद्धा आलाय ‘हा’ मेसेज तर व्हा सावध, जाणून घ्या काय लिहीलंय त्यामध्ये ?