‘कोरोना’च्या विरूध्द लढाई : भारतासाठी दिलासादायक ! 20 देशांच्या यादीत आता देखील 16 व्या क्रमांकावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमाल घातले आहे. भारतातही याचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान सर्वाधिक प्रभावित झालेल्या 20 देशांमध्ये भारत 16 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या अकरा देशांमध्ये 50 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद आहे. तर सर्वाधिक रूग्ण आणि मृत्यूंमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन आहेत. पृथ्वीवरील स्वर्ग आणि कमी लोकसंख्या असलेल्या स्वित्झर्लंडपेक्षा भारत अधिक चांगल्या स्थितीत आहे. डब्ल्यूएचओ आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या रिसोर्स सेंटरच्या मते सोमवारी संध्याकाळपर्यंत स्वित्झर्लंड 15 व्या क्रमांकावर होता, जिथे 63 दिवसानंतर कोरोनाच्या 29,061 रूग्णांची नोंद असून 1610 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 89 दिवसांच्या आत भारतात 27,892 संसर्ग होण्याची पुष्टी झाली, तर 872 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील पहिली घटना 30 जानेवारी रोजी समोर आली. तर स्वित्झर्लंडमध्ये 25 फेब्रुवारी रोजी म्हणजेच भारताच्या 26 दिवसांनंतर. आज 86 लाख लोकसंख्या असलेला स्वित्झर्लंड 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतापेक्षा जास्त प्रभावित आहे. जर आपण आकडेवारी पाहिली तर स्वित्झर्लंडमध्ये दररोज सरासरी 461 रुग्ण आढळले आणि दररोज सरासरी 25 लोक मरण पावले. त्यानुसार भारतात दररोज 313 रुग्ण आढळले आणि रोज नऊ लोकांचा मृत्यू झाला.

पेरू : भारतापेक्षा 375 रुग्ण कमी…
लोकसंख्या तीन कोटी. 6 मार्च रोजी पहिले प्रकरण. 63 दिवसांत 27,517 रुग्णांची नोंद. जिथे भारतापेक्षा 375 रुग्ण कमी आहेत. येथेही 728 लोक मरण पावले आहेत. येथे दर दहा लाख लोकसंख्येकाठी 7059 लोकांची तपासणी केली जात आहे, तर त्यानुसार प्रत्येक दहा लाख लोकसंख्येनूसार 22 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

पोर्तुगाल : भारतापेक्षा मृत्यू जास्त
लोकसंख्या एक कोटी. भारतापेक्षा रुग्ण कमी आहेत, परंतु मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. येथे पहिली घटना 57 दिवसांपूर्वी आढळली, आतापर्यंत 23,864 संक्रमित तर 903 मृत्यूची नोंद झाली आहे. येथे दर दहा लाख लोकसंख्येवर 32,414 लोकांची तपासणी केली जाते तर 89 लोकांच्या मृत्यूची आहे.

इक्वाडोर : 22 हजार संक्रमित, दररोज 33 मृत्यू
एक कोटी 72 लाख लोकसंख्या असलेल्या या ठिकाणी 29 फेब्रुवारी रोजी पहिले प्रकरण समोर आले. 59 दिवसांत 22,719 लोक कोरोनाच्या कचाट्यात तर आतापर्यत 576 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे दहा लाख लोकसंख्येमागे 3203 लोकांची तपासणी केली जात आहे, तर दर दहा लाख लोकसंख्येमध्ये मृत्यूची संख्या 33 आहे.

भारतात दहा लाख लोकसंख्येमागे 500 लोकांची तपासणी
टॉप 20 देशांच्या तुलनेत भारतात तपासणीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात सुमारे 665,819 लाख लोकांची कोरोना तपासणी झाली आहे. त्यानुसार, दहा लाख लोकसंख्येमध्ये सरासरी 500 लोकांची तपासणी केली जात आहे.