‘लॉकडाउन’मध्ये सरकारने गरीबांसाठी केलेल्या उपाय योजना अपुर्‍या : नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनच्या काळात मोदी सरकारने गरीबांसाठी केलेल्या उपाय योजना अपुर्‍या आहेत असा हल्लाबोल नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी सरकारवर केला आहे. मोदी सरकारने गरीबांच्या मदतीसाठी काही चांगल्या योजना आखाव्यात आणि त्यांना भरीव मदत करावी असाही सल्ला बॅनर्जी यांनी दिला आहे.

कोरोनावर जोपर्यंत प्रतिबंधात्मक लस येत नाही तोपर्यंत या संकटातून सुटका होणे कठीण आहे. अशा कठीण काळात मोदी सरकारने गरीबांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवाव्यात. लॉकडाउननंतरच्या काळात, पुढे काय करायचे आहे? हा प्रश्न मोदी सरकारला पडला पाहिजे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो लॉकडाउन पुकारण्यात आला आहे त्यामुळे अनेकांच्या कमाईची साधने बंद झाली आहेत. ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.

अशांसाठी सरकारने भरीव उपाय योजले पाहिजेत. लॉकडाउन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने गरीबांच्या खात्यात थेट अर्थ सहाय्य आणि अन्न सुरक्षा उपलब्ध करुन दिले. मात्र हे उपाय पुरेसे नाहीत. असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.