Covid19 Infection | भविष्यात कोरोनाविरूध्द लढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना दिले निर्देश, मुलांसाठी 20 टक्के बेड राहतील ‘राखीव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Covid19 Infection | कोरोना व्हायरसचा कहर सूपर्ण जग सहन करत आहे. हा व्हायरस (Corona virus) किती धोकादायक आहे, हे संपूर्ण विश्वाने याच्या दुसर्‍या लाटेत पाहिले आहे. आता कोरोना संसर्गात (Covid19 Infection) थोडी घसरण झाली असताना केंद्र सरकारचा हा प्रयत्न आहे की, सर्व राज्यांनी अशी पावले उचलावीत जेणेकरून भविष्यात पुन्हा कोरोनाचा कहर होणार नाही. हेच लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्य सरकारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

केंद्र सरकारने 9 जुलैला 23000 कोटी रुपयांच्या कोविड पॅकेजची घोषणा केली होती. या पॅकेजचा वापर एक वर्षात करायचा आहे. ते एक वर्षात संपवायचे आहे. केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हा निधी राज्यांना जिल्हा स्तरावर लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी मदत म्हणून दिला जात आहे. कोविडविरूद्ध राज्य सरकार कोण-कोणती पावले उचलत आहे याची पूर्ण माहिती तयार करून राज्य सरकारांना केंद्राला द्यावी लागेल.

मुलांसाठी 20 टक्के बेड राहतील रिझर्व्ह
कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसात मूलभूत आरोग्य व्यवस्थांबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तालुकास्तरावर अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हत्या. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. केंद्राने म्हटले की, प्रत्येक तालुक्यात अ‍ॅम्ब्युलन्स असेल आणि तिचे भाडे केंद्राकडून दिले जाईल.

औषधाचा बफर स्टॉक प्रत्येक जिल्ह्यात ठेवावा लागेल. पीएफए, ऑक्सीजन कॉन्सट्रेटर सुद्धा पुरेशा प्रमाणात ठेवावे लागतील. 1 लाख कॉन्सट्रेटर असावेत, आता हॉस्पिटलमध्ये मुलांसाठी 20 टक्के कोविड बेड रिझर्व्ह राहतील.

 

राज्यांना 1887.80 कोटी अ‍ॅडव्हान्स

केंद्राच्या वाट्याचे 50 टक्के अ‍ॅडव्हान्स राज्यांना दिले गेले आहे. 13 ऑगस्टला 7500 कोटी जारी केले गले. 60:40 च्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारांना खर्च करायचा आहे. नार्थ ईस्टमध्ये 90:10 च्या प्रमाणात खर्चाची विभागणी होईल. सरकारने यापूर्वी 22 जुलैला 1887.80 कोटी रुपये राज्यांना अ‍ॅडव्हान्स दिले होते.

केंद्राने राज्यांना जिल्हा स्तरावर कोरोनापासून वाचण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
सूत्रांनी सांगितले की, दुसर्‍या लाटेदरम्यान ऑक्सीजन नव्हे तर लॉजिस्टिक्सची सर्वात मोठी समस्या होती.
ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे देशात मृत्यू होऊ लागल्याने अनेक देशांनी आपल्याला ऑक्सीजनचा पुरवठा केला होता.

आता भविष्यात जर कोरोनाची संभाव्य लाट आली तर अशा स्थितीत ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी देशभरात आतापर्यंत 375 प्लांट लावले आहेत.
500 अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये आहेत तर एकुण 1755 प्लांट लावायचे आहेत.
सूत्रांनुसार 12 पेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी व्हॅक्सीन ड्रग्ज कंट्रोलरकडे आहे ती क्लियर होताच मुलांचे सुद्धा लसीकरण सुरू होईल.

Web Title :-  Covid19 Infection | central government has issued guidelines to the states to deal with corona in future the 20 percent beds will be reserved for children corona fund release to states

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eta Variant of Covid-19 | नवं संकट ! कर्नाटकमध्ये समोर आला कोरोना व्हायरसचा ‘Eta व्हेरिएंट’, जाणून घ्या किती आहे धोकादायक

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात एंट्रीसाठी दोन्ही ‘डोस’ आवश्यक, RTPCR रिपोर्ट नसेल तर 14 दिवस राहावे लागेल ‘क्वारंटाइन’

Pune Crime | इंस्टाग्रामवर ‘त्या’ महिलेशी झालेली ओळख तरुणाला महागात पडली, महिलेनं ठेवले जबरदस्तीने ‘संबंध’; पण…