देशात ‘कोरोना’ रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 50 ट्क्क्यांच्या जवळ, सगळ्यात कमी मृत्यू भारतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतत कोरोना विषाणूच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 48.07 टक्क्यावर पोहचले आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशातील कोरोना विषाणूचे 95 हजार 527 रुग्ण बरे झाले आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, देशात कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाण 2.82 टक्के आहे, जे जगातील सर्वात कमी आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 3708 रुग्ण बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात पूर्वीच्या तुलनेत चाचणी सुविधा वाढविण्यात आली आहे. देशात दररोज 1 लाख 20 हजाराहून अधिक चाचण्या घेतल्या जात आहेत. कोरोनाची प्रकरणे वेळेत ओळखून त्यावर उपचार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 73 टक्के रुग्णांना इतर दुसरे आजार होते. देशात 10 टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्याचवेळी आयसीएमआरने म्हटले आहे की, आम्ही कोरोना चाचणी वाढविण्यासाठी इतर स्वतंत्र प्लॅटफॉर्म देखील वापरत आहोत. टूनैटा स्क्रिनिंग अँड कन्फर्मेशन टेस्टला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे चाचणीची व्याप्ती वाढली आहे. 11-12 विक्रेत्यांकडून आरटी-पीसीआर किट वापरून भारतीय आरएनए एक्सटॅक्शन किट मोठ्या संख्येने उपलब्ध होत आहेत. आयसीएमआरने म्हटले आहे की, कोरोनाची चाचणी घेण्यासाठी दररोज सरासरी 1.20 लाख नमुने तपासले जात आहेत. सध्या देशात या चाचणीसाठी 476 सरकारी आणि 205 खासगी प्रयोगशाळा आहेत.