RJ : ‘कोरोना’ कॉलर ट्यून ऐकून कानाचा ‘पक्वाज’ झालाय, करा बंद : कॉंग्रेस आमदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत कोरोनाविरूद्ध जनजागृती मोहीम राबवित आहेत, तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्षाच्या एका आमदाराने कोरोना जनजागृतीसाठी सरकारकडून ऐकवल्या जाणाऱ्या कॉलर ट्यूनवर आक्षेप नोंदविला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि सांगेद आमदार भरतसिंग यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे की, फोनमध्ये वाजणारी कोरोना व्हायरस कॉलर ट्यून बंद करावी. भरतसिंग म्हणाले की, ही ट्यून मार्चमध्ये सुरू झाली होती आणि आता जून आला आहे, ज्यांना ऐकायचे होते आणि समजून घ्यायचे होते, त्यांना ते नक्कीच समजले असेल. आता हे पुढे चालू ठेवू नये. ही ट्यून ऐकून कान पकले आहेत.

दरम्यान, भरतसिंग हे राजस्थानचे एक मोठे नेते आहेत. आधीच्या गहलोत सरकारमध्ये ते मंत्री होते, पण यावेळी ते मंत्री झाले नाहीत. भरतसिंग राजस्थानमध्ये आपल्या अश्या प्रकारच्या पत्रांसाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी लॉकडाऊनमधील दारू बंदी संपुष्टात आणण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पत्र लिहिले होते.

कोरोनाबद्दल सावधगिरी सांगणाऱ्या कॉलर ट्युनच्या विरोधात भरतसिंग यांचे पत्र अशा वेळी आले आहे, जेव्हा स्वत: मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि त्यांचे संपूर्ण सरकारी कर्मचारी कोरोनाविरूद्ध सर्व स्तरांवर लढाई लढत आहेत.