Remdesivir ने ‘कोरोना’वर उपचार घेत असलेल्या रूग्णांना मोठा धक्का ! WHO च्या चाचणीत अयशस्वी ठरले औषध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना महामारीमध्ये लोकांचा जीव वाचवण्यासाठी अमेरिकन फार्म कंपनी गिलियडच्या रेमडेसीव्हिर नावाच्या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अयशस्वी असल्याचे सांगितले आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालात म्हटले आहे की, कोविड -19 मुळे झालेल्या मृत्यूवर ब्रेक लावण्यासाठी रेमडेसीव्हिर (Remdesivir)औषध प्रभावी नाही. औषधाच्या क्लिनिकल चाचणीच्या निकालानंतर संस्थेने ही माहिती दिली आहे. डब्ल्यूएचओचा अहवाल हा अमेरिकन औषध कंपनीसाठी एक मोठा धक्का आहे.

कोरोना विषाणूच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये रेमडेसीव्हिर (Remdesivir) औषध संक्रमितांसाठी एक आशेचा किरण म्हणून उदयास आले होते. या वर्षाच्या मे महिन्यात, कंपनीने घोषणा केली होती की, रेमडेसीव्हिर अ‍ॅण्टीवायरल औषध कोरोना रुग्णांवर प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. सुरुवातीच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, हे औषध कोविड -19 रुग्णांना लवकर बरे करू शकते, काही प्रकरणांमध्ये असे घडले आहे. तथापि, डब्ल्यूएचओ चाचणीत गिलियडचे हे औषध अपयशी ठरले आहे.

माध्यमांच्या अहवालानुसार, डब्ल्यूएचओने 30 देशांमधील 1,266 प्रौढ कोरोना संक्रमितांवर क्लिनिकल ट्रायल केले होते. या सर्व रूग्णांना रेमडेसीव्हिर (Remdesivir) तसेच एचआयव्ही अण्टी ड्रग कॉम्बीनेशन लोपीनवीर किंवा रीटोनविर, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, आणि इंटरफेरॉन या चार संभाव्य औषधे ज्यांचे परिणामांचे मूल्यांकन केले गेले होते त्यांना दिले गेले. गुरुवारी झालेल्या चाचणीत, डब्ल्यूएचओला आढळले की, रेमडेसीव्हिर औषध मागील 28 दिवसांच्या मृत्यू दर आणि रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना बरे करण्यात अयशस्वी ठरले आहे. डब्ल्यूएचओ चाचणीचे हे प्रारंभिक परिणाम आहेत, अजून डिटेल रिव्ह्यू करणे बाकी आहे. दरम्यान, सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना लसीबाबत दिलासा दिला आहे. सौम्या यांच्या म्हणण्यानुसार, कोविड -19 ही लस 2020 च्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस येईल.