भारतीय नौदलावर कोरोना व्हायरसचं सावट, टेस्टमध्ये मुंबईतील INS आंग्रे वरील 20 नौसैनिक ‘पॉझिटिव्ह’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   देशातील सर्वाधिक बाधित शहर म्हणून मुंबईची ओळख निर्माण झाली असताना आता येथील नौदल तळावरही कोरोनाने हल्ला केला आहे. येथील आयएनएस आंग्रे या नौकेवरील किमान २० नौ सैनिकांना कोरोनाची लागण झाली आहे. वेस्टर्न नेव्हल कमांडच्या किनार्‍यावर असलेल्या लॉजिस्टिक अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट बेस आयएनएस आंग्रेवर हे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत.

या सर्वांना नेव्हल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नौदलामध्ये कोरोना संसर्ग पसरण्याची ही पहिलीच घटना आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर नौसैनिक संक्रमित झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
लॉकडाऊनमुळे हे सर्व सैनिक त्यांच्या घरीच होते. आणि बाहेरील कोणाशीही त्यांचा संपर्क झाला नाही, हे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. मात्र, कोणामुळे आयएनएस आंग्रे येथे आलेल्या खलाशी किंवा अधिकार्‍यांना संक्रमित झाले आहेत, हे स्पष्ट झाले नाही. संक्रमित झालेले सर्व नौ सैनिक हे खलाशी आहेत. या तळावर बाहेरुन आलेल्यांची चौकशी केली जात आहे