Coronavirus : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर आपल्या मुलांना फ्लूची लस देणं कशामुळं महत्वाचं?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देश कोरोना व्हायरस Coronavirus महामारीच्या संकटाला तोंड देत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत लहान बालकांमध्ये कोरोनाचा Coronavirus प्रसार होण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बालकांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशी शक्यता आतापर्यंत अनेक वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाची लागण बालकांना अत्यंत कमी प्रमाणात होतेय किंवा त्यांच्या शरीरात जास्त प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असते असं समजलं जायचं.

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत

मुलुंड येथील डॉ. जेसल सेठ यांनी सांगितलं की, “कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ६० वर्षावरील वृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणावर लागण झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वयोगटातील लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाल्याचं दिसून आला. त्यामुळे प्रौढ वयोगटातील बहुतांश लोकांना एक तर कोरोना होऊन गेला आहे किंवा त्यांनी कोरोनाच्या एक किंवा दोन्ही लसी घेतल्या आहेत. त्यामुळे देशात तिसरी लाट येण्याची शक्यता असताना त्याचा फटका हा बालकांना मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेदरम्यान बालकांमध्ये तीव्र प्रकारचा ताप किंवा लक्षणं दिसू नयेत याकडे आता वैद्यकीय तज्ज्ञांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.”

इंडियन ॲकेडमी ऑफ पेडियाट्रिक्सने या आधीच पाच वर्षाच्या आतील मुलांना फ्लूची लस द्यावी अशी शिफारस केली आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे की, ज्या मुलांना इन्फ्लूएंझा फ्लूची लस देण्यात आली आहे त्या मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी प्रमाणात झाला आहे. कोविड १९ आणि इन्फ्लुएंझा या दोन्हीमध्ये काही समान लक्षणं दिसून येतात. जर कोरोनाच्या या लाटेमध्ये इन्फ्लुएंझाची साथ आल्यास या महामारीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर बालकांना फ्लूची लस आधीच दिली तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका हा दुसऱ्या लाटेप्रमाणे बसणार नाही, या लसीमुळे बालकांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

कोरोनाची लस आणि फ्लूची लस या दोन्ही लसी वेगवेगळ्या आहेत. या दोन लसींमध्ये चार आठवड्यांचे अंतर ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे बालकांच्या शरीरात अॅन्टिबॉडी तयार होऊ शकतील आणि त्यांचं शरीर कोरानाविरोधात लढण्यासाठी सज्ज होईल. बालकांना फ्लूची लस दिल्यास आरोग्य यंत्रणवरचा ताण कमी होईल तसेच आता ज्या प्रमाणात चाचण्या कराव्या लागतात त्या प्रमाणातही घट होईल. महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलेल्या पेडियाट्रिक टास्कफोर्सनेही या फ्लूच्या डोसची शिफारस केली आहे. त्यांच्या मते, हा डोस जर बालकांना दिला तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका कमी प्रमाणात बसेल.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती