Covishield and Covaxin | ‘कोविशील्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ कोरोनाच्या अल्फा, गामा, बीटा, डेल्टा व्हेरिएंटवर परिणामकारक; सरकारने दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Covishield and Covaxin |भारतात तयार करण्यात आलेली कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि कोविशील्ड (Covishield) दोन्ही व्हॅक्सीन कोरोना व्हायरस (Corona Virus) ची चिंता वाढवणार्‍या सर्व व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी आहेत. सरकारने दावा केला की, दोन्ही व्हॅक्सीन कोरोनाच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंट्सच्या विरूद्ध परिणामकारक आहेत. डेल्टा प्लसबाबत सध्या अभ्यास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते की, कोविड-19 चे दोन्ही डोस (कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन) कोरोनाच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध काम करतात.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

कोरोना व्हायरसचे 4 व्हेरिएंट – अल्फा, बीटा, गामा (Alpha, Beta, Gamma) आणि डेल्टा चिंताजनक व्हेरिएंट आहेत, तर डेल्टाशी संबंधीत डेल्टा प्लस व्हेरिएंटने सुद्धा देशाची चिंता वाढवली आहे. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) चे डायरेक्टर जनरल बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वेगवेगळ्या व्हेरिएंटला नष्ट करण्याच्या डोसच्या क्षमतेत कमतरता आवश्य दिसते.

त्यांनी म्हटले की, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन अल्फा व्हेरिएंटवर पूर्णपणे प्रभावी आहे.
कोविशील्ड अल्फासह 2.5 पट घटते.
डेल्टा स्वरूपाबाबत कोव्हॅक्सिन प्रभावी आहे.
परंतु अँटीबॉडी प्रतिक्रिया तीन पटपर्यंत कमी होते, तर कोविशील्डसाठी, ही कमतरता दोन पट आहे, तर फायजर आणि मॉडर्नात ती कमतरता सातपट आहे.

भार्गव यांनी म्हटले, डेल्टा प्लस व्हेरिएंट आता 12 देशांमध्ये आहे.
भारतात डेल्टा प्लसची 10 राज्यांत 48 प्रकरणे समोर आली आहेत आणि ती खुप स्थानिकीकरणाची आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंटची मध्य प्रदेशात 7, महाराष्ट्रात 20, पंजाबमध्ये 2, गुजरातमध्ये 2, केरळात 3, तमिळनाडुत 9, आंध्र प्रदेश, ओडिसा, राजस्थान,
जम्मू, कर्नाटकमध्ये एक-एक प्रकरण आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळला, आणि याच्यामुळे तिसरी लाट येऊ शकते असे म्हटले जात आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : covishield and covaxin are effective on alpha gamma beta delta
variants of corona the government gave information

हे देखील वाचा

Pune Unlock | पुणे महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर ! सोमवारपासून सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच, जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद

Natural Gas Price | 1 ऑक्टोबरला ठरणार घरगुती गॅसच्या नवीन किंमती; दर 60 टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता : ONGC

Burglary in Pune | नर्‍हे परिसरातील गोडाऊन फोडून 62 लाखाचा माल लंपास, सिंहगड रोड पोलिसांकडून एकाला अटक