कोविशील्ड, कोव्हॅक्सीन की स्पुतनिक – कोणती Covid Vaccine आहे किती परिणामकारक, जाणून घ्या तिन्हींबाबत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेदरम्यान सरकारने रशियाची व्हॅक्सीन स्पुतनिक व्ही ला सुद्धा भारतात इमर्जन्सी वापरासाठी मंजूरी दिली आहे आणि पुढील आठवड्यात ही व्हॅक्सीन सुद्धा भारतातील लोकांना देण्यास सुरूवात होईल. सध्या भारतात सीरम इन्स्टीट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सजीन- या दोन व्हॅक्सीनचे डोस दिले जात आहेत. परंतु या तीन पैकी कोणती व्हॅक्सीन किती परिणामकारक आहे आणि कुणाचे साईड इफेक्ट होऊ शकतात, याबाबत जाणून घेवूयात…

तीनपैकी कोणत्या व्हॅक्सीनची क्षमता किती?

प्रभाव म्हणजे व्हॅक्सीनच्या क्षमतेबाबत बोलायचे तर रशियाची स्पुतनिक व्ही 91.6 टक्के परिणामकारक आहे आणि आजाराला गांभीर्याने कमी करण्यात तिची प्रतिक्रिया खुप जास्त आहे. तिच्या तुलनेत कोव्हॅक्सीन 81 टक्के परिणामकारक आहे तर कोविशील्ड 70.4 टक्के परिणामकारक आहे.

कशा तयार केल्या आहेत या तीन व्हॅक्सीन ?

रशियाची स्पुतनिक व्ही दोन वेगवेगळ्या एडिनोव्हायरसने मिळून बनवली आहे, जो कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, तापास जबाबदार असतो. तर कोविशील्ड सुद्धा स्पुतनिक सारखीच व्हॅक्सीन आहे जी कॉमन कोल्ड व्हायरसच्या कमजोर व्हर्जनने बनवली आहे. तर कोव्हॅक्सीन एक निष्क्रिय व्हॅक्सीन आहे जी मृत कोरोना व्हायरसपासून बनवली आहे.

स्पुतनिक व्ही चे साईड इफेक्ट

– डोकेदुखी

– खुप जास्त थकवा जाणवणे

– इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना

– फ्लू सारखा आजार

कोव्हॅक्सीनचे साईड इफेक्ट

– इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना, सजू किंवा लाल होणे

– ताप

– घाम येणे किंवा थरथरणे

– अगंदुखी

– मळमळणे आणि उलटी होणे

– खाज आणि रॅशेज

– डोकेदुखी

ज्या लोकांना ब्लिडिंगसबंधी आजार आहेत, रक्त पातळ होण्याचे औषध घेत आहेत, गरोदर महिला, बाळाला स्तनपान देणार्‍या महिलांनी ही व्हॅक्सीन घेऊ नये.

कोविशील्डचे साईड इफेक्ट

जगातील 62 देशात ऑक्सफोर्ड-एस्ट्रेजेनेकाची कोविशील्ड व्हॅक्सीन वापरली जात असली तरी सध्या व्हॅक्सीनचे अनेक साईड इफेक्ट्स समोर येत आहेत, ज्यामुळे व्हॅक्सीनवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष करून ब्लड क्लॉट होण्याचा साईड इफेक्ट.

– इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना

– इंजेक्शनच्या ठिकाणी लालसरपणा

– हलका किंवा जास्त ताप

– खुप जास्त सुस्ती आणि जांभया येणे

– हातांना आखडल्यासारखे वाटणे

– अंगदुखी