Covishield लवकरच बाजारात उपलब्ध होईल, ‘सीरम’चे CEO अदर पुनावाला यांनी केलं ट्विट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा, कोव्हिशील्ड भारतात मान्यता मिळालेली पहिली लस आहे. सुरक्षित आणि प्रभावी असलेली ही लस येत्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होईल, असा विश्वास सीरम इन्सि्टट्यूटचे सीईओ अदर पुनावाला ( CEO of Serum Institute, Adar Poonawalla) यांनी सांगितले आहे. पुनावाला यांनी याबाबत ट्विट केले आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना लशीबाबत खूशखबर मिळाली आहे. डीसीजीआयने सीरम इन्सिट्यूटच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला भारतात आपत्कालीन वापराला मान्यता दिली आहे. दरम्यान दोन्ही लशींना आप्तकालीन मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी टि्वट केले. ते म्हणाले की, डीसीजीआयने सीरम इन्सिट्यूटच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे. देशाचे अभिनंदन. आमच्या साऱ्या मेहनती वैज्ञानिक आणि नवीन संशोधकांचे मन:पूर्वक अभिनंदन.

दरम्यान, DCGI चे बी जी सोमानी यांनी म्हटले आहे की, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून थोडेदेखील धोकादायक असलेल आम्ही काहीही मंजूर करणार नाही. या लशी 100 % सुरक्षित आहेत. सौम्य ताप येणे, वेदना होणे आणि अ‍ॅलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लसीसाठी सामान्य असतात. जर यावरुन लोक असंयम दाखवत असतील तर हे चुकीच आहे.