Covishield | कोविशील्ड व्हॅक्सीनच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा कमी होऊ शकते, 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना मिळू शकते सूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Covishield Vaccine | केंद्र सरकार लवकरच पुन्हा एकदा कोविशील्ड व्हॅक्सीन (Covishield Vaccine) च्या दोन डोसमधील कालावधी कमी करू शकते. मात्र असे केवळ 45 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकासाठी होईल. कोविड-19 वर्किंग ग्रुपचे चेयरमन डॉ. एन. के. अरोरा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, यावर दोन ते चार आठवड्यात निर्णय घेतला जाऊ शकतो. द मिंटच्या एका रिपोर्टनुसार त्यांनी म्हटले की, याबाबत अखेरचा निर्णय सायंटिफिक पुराव्यांच्या आधारावर घेतला जाईल.

सर्व प्रौढांसाठी कोविशील्ड व्हॅक्सीनच्या दोन डोसमधील अंतर 12-16 आठवड्यांचे आहे. व्हॅक्सीनेशन प्रोग्रामच्या सुरुवातीला हे अंतर 4-6 आठवड्यांचे होते. यानंतर ते वाढवून 4-8 आठवडे केले आणि पुन्हा हे अंतर वाढवून 12-16 आठवडे केल्यानंतर वाद सुद्धा निर्माण झाला होता.

तेव्हा यास व्हॅक्सीनची टंचाई लपवण्याचा प्रयत्न म्हटले गेले होते. तज्ज्ञ, दुसरीकडे दावा करतात की, हा निर्णय नवीन आंतरराष्ट्रीय शास्त्रीय संशोधनावर आधारित होता. ज्यामध्ये हा सल्ला दिला होता की, व्हॅक्सीनच्या डोसमधील जास्त अंतर असल्यास शरीरात जास्त अँटीबॉडी बनते.

 

चांगल्या परिणामासाठी वाढवले अंतर

या परिक्षणात व्हॅक्सीनच्या पूर्वी डोसच्या नंतर बनणारी अँटीबॉडीचा स्तर तुलनात्मक रूपाने जास्त होते. परिणामी, यासाठी पहिला डोसने आणि चांगले परिणाम मिळण्यासाठी अंतर वाढविले आहे. मात्र, जूनमध्ये जेव्हा भारताने दोन्ही डोसच्या दरम्यानचे अंतर वाढवले.

भारतीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लसीकरणाची स्थिती बदलणार आहे आणि नवीन संशोधनासह यामध्ये बदल होतील,
परंतु सार्वजनिक आरोग्य नेहमी कोणत्याही पर्यायात प्राथमिकतेवर राहील.
कारण कोविशील्ड व्हॅक्सीन ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका व्हॅक्सीनच्या समान आहे,
अशावेळी तिच्या प्रत्येक डोसच्या प्रभावाचा डाटा जगभरात उपलब्ध आहे.

Web Title :- Covishield | govt may reduce gap between covishield doses but only for those aged 45 and above report

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Virat Kohli | विराट कोहली भारतीय टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्तवेळा शून्यावर OUT होणार कर्णधार, Dhoni चा तोडला विक्रम

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 7,120 ‘कोरोना’मुक्त; 6,695 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Anil Deshmukh | सीबीआयला राज्य सरकार सहकार्य करत नाही, अधिकाऱ्याला सहाय्यक पोलिस आयुक्त धमकावतात