Covishield | ऑक्सफर्डचे नवे संशोधन ! ‘कोविशील्ड’चा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा

लंडन : वृत्तसंस्था –  कोरोनाचे (corona) संकट अजून टाळले नसून आता कोरोना विषाणूने वातावरणाशी जुळवून घेत स्वतःत बदल करून घेत आहे त्यामुळे कोरोनाचे सध्या वेगवेगळे व्हेरिअंट समोर येत आहेत. ब्रिटन पाठोपाठ आता भारतातही डेल्टा प्लस हा कोरोनाचा व्हेरिअंट (Delta Plus variant) आढळून आला. या व्हेरिअंटने ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातला आहे. Covishield | need third dose covishield boosts immune response oxford study finds

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

भारतात अजून प्रमाण कमी असे तरी सर्तकतेचा इशारा दिला आहे.
देशात लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवला जात असतानाच सर्वाधिक पसंतीची असणारी कोविशील्ड (Covishield) बनविणाऱी कंपनी एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने (Oxford University) कोविशील्डच्या तिसऱ्या डोसची गरज आहे का यावर नुकतेच संशोधन केले.
त्यामध्ये कोविशील्डचा तिसरा डोस (Third dose of Covishield) घेतला तर कोरोनापासून अधिक सुरक्षा मिळत असल्याचे समोर आले.
ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीच्या संशोधकांच्या मतानुसार एस्ट्राजेनेकाच्या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिन्यांनी बुस्टर डोस घ्यावा लागणार आहे.
यामुळे शरिरातील अँटीबॉडीचा स्तर वाढणार आहे. त्याचबरोबर कोरोना लसीचे (corona vaccine) दोन डोस कोरोना व्हायरसविरोधात चांगले निकाल देतील.
कदाचित तिसऱ्या डोसची गरजही भासणार नाही अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

सध्या डेल्टा व्हेरिअंटमुळे (Delta Plus variant) जगाच्या चिंतेत भर पडली आहे.
मात्र या अभ्यासानुसार एस्ट्राजेनेका व फायजर कंपनीच्या लसींचे दोन्ही डोस घेतल्यास डेल्टा व्हेरिअंटमुळे हॉस्पिटलमध्ये भरती होण्य़ाची शक्यता जवळपास ९६ टक्क्यांनी कमी होऊ शकते.
त्याचबरोबर संशोधनात एस्ट्राजेनेकाच्या लसीबाबत (Estrogenic vaccine) असेही दिसून आले आहे कि या लसीचा एक डोस घेतला तर शरीरात कमीतकमी एक वर्षापर्यंत अँटीबॉडी (Antibody) टिकतात असे समोर आले आहे.
त्यानंतर दुसरा डोस घेतला तर सुरक्षा आणखी वाढते.
वय ४० असणाऱ्या ९० लोकांनी तिसऱ्या डोससाठीच्या नवीन संशोधनात भाग घेतला होता.
या सर्वांना तिसरा डोस दिला होता.
त्याचबरोबर अँटीबॉडीचा स्तर तपासण्यासाठी त्यांची रक्त चाचणी केली होती.

Web Title : Covishield | need third dose covishield boosts immune response oxford study finds

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Covid-19 : मागील 24 तासात सापडले कोरोनाचे 48786 नवीन रूग्ण, कालच्या तुलनेत 6% जास्त प्रकरणे