Covishield | ‘सीरम’ची कोविशील्ड लस घेतलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Covishield | भारतात आलेल्या कोरोनाच्या लाटेने लोकांना भयावह करून सोडलं होतं. अनेक लोकांना या विषाणूची धास्ती लागली होती. दैनंदिन वाढणारे रुग्ण आता कमी होऊ लागले आहेत. देशातील कोरोनाची लाट नियंत्रित आली आहे. मागील दोन महिन्यात बाधितांची संख्या साधारण चार लाख पर्यंत होती. सध्या मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. आज कोरोनाची लाट देशातून पायउतार झाली आहे. पण तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर देशात लसीकरणाला अधिक गती देण्याची आवश्यकता निर्माण झालीय. मात्र कोविशील्ड लसीबाबत (Covishield vaccine) एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

देशात कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेमध्ये भारत बायोटेकच्या (India Biotech) कोवॅक्सिन आणि पुण्यातील सीरमच्या (Serum) कोविशील्ड लसीचा सर्वाधिक वापर होत आहे. पुण्यातील सीरमची उत्पादन क्षमता प्रचंड असल्याने सर्वाधिक लोकांना सीरमची कोविशील्ड (Covishield) लस मिळाली आहे. विशेष म्हणजे कोविशील्ड लस कोरोना महामारीविरोधात 93 टक्के सुरक्षा देते आणि यामुळेच मृत्यूदर 98 टक्क्यांनी घटतो आहे. याबाबत माहिती केंद्र सरकारने दिली आहे. याचबरोबर सर्व नागरिकांनी लस घेण्याचं आवाहन देखील सरकारने केलं आहे.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr. V. K. Paul) यांनी माहिती दिली आहे. की, कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे (Delta variant) भारतात कोरोनाची दुसरी लाट आली होती. याचबरोबर याबाबत सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयानं (AFMC) रिपोर्ट तयार केल्याची माहिती पॉल यांनी दिली आहे. तर, कोरोना विरोधाच्या लढाईत अग्रस्थानी राहून लढणारे पंधरा लाख डॉक्टर्स (Fifteen million doctors) आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या आरोग्याचा अभ्यास करून AFMC ने रिपोर्ट बनवला. कोविशील्डची लस घेतलेल्या 93 टक्के लोकांना दुसऱ्या लाटेत विषाणूपासून संरक्षण मिळालं आहे. असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

डॉ. व्ही. के. पॉल (Dr. V. K. Paul) यांनी सांगितलं आहे की,
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर संक्रमणाचा धोका कमी होतो. मात्र याची संपूर्ण खात्री देता येत नाही.
दुसरी लाट आली असताना कोविशील्डमुळे मृत्यूदर 98 टक्क्यांनी कमी झाला,
तसेच, कोरोनाची लागण होणारच नाही अशी खात्री कोणतीच लस घेतल्यानंतर देता येत नाही.
परंतु, लस घेतल्यामुळे गंभीर परिस्थिती टाळता येते. दरम्यान, आपल्याकडे असलेल्या लसींवर विश्वास ठेवा.
लसीकरण करून घ्या आणि लस घेतल्यावर सतर्क राहा. बेजबाबदारपणे वागू नका,
असं देखील आवाहन असं आवाहन डॉ. व्ही. के. पॉल यांनी केलं आहे.

Web Title :- covishield reduces fresh infections 93 percent deaths 98 percent says afms study

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parambir singh | परमबीर सिंग यांच्या विरोधातील गुन्ह्यांच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून SIT ची नेमणूक; 2 DCP, 2 ACP अन् महिला PI च्या अडचणी वाढ?

Police Officer Transfer | मुंबईतील पोलिस उपायुक्त पठाण व मणेरे, सहाय्यक आयुक्त संजय पाटील व शिंदे आणि मपोनि आशा कोरके यांची बदली

Health Tips | पावसाळ्यात भिजल्यावर ‘या’ पध्दतीनं करा सर्दी-खोकल्यापासून बचाव, अवलंबा ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या