Covishield Vaccine | कोविशील्ड लस घेतलेल्या 11 जणांना झाला ‘हा’ दुर्मिळ आजार; तज्ज्ञांच्या संशोधनातून खुलासा

नवी दिल्ली / लंडन : वृत्तसंस्था (Policenama Online) – कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेनंतर बहुतांश तज्ज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देशात कोरोना प्रतिबंधक लशींची गती वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. भारतात कोव्हीशील्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (covaxin) लस देण्यात येत आहे. दरम्यान देशात कोव्हीशील्ड लसीचा (Covishield Vaccine) अधिक वापर केला जातो. परंतु, ऍस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्डची (AstraZeneca-Oxford) कोरोना प्रतिबंधक लस म्हणजे ती भारतात ओळखली जाणारी कोव्हीशील्ड लस. ही लस घेतलेल्या तब्बल 11 नागरिकांना दुर्मीळ आजार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. Covishield Vaccine | 11 had rare illness conclusions independent research experts india uk

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

केरळ (keral) राज्यात कोविशिल्डची (Covishield ) लसीचा डोस घेतल्यानंतर 7 जणांना गिलन बार सिंड्रोम (Gillian Barr syndrome) आजार झाला आहे. गिलन बार सिंड्रोम हा मेंदूशी संबंधित आजार आहे. हा आजार झालेल्या या व्यक्तींनी एकाच लसीकरण केंद्रामधून हा लसीचा डोस घेतला होता. या लसीकरण केंद्रात आजतागायत सुमारे बारा लाख नागरिकांचे लसीकरण झालेलं आहे. दरम्यान, ब्रिटनमधील (Britain) नॉटिंगहॅममध्ये 4 नागरिकांना गिलन बार सिंड्रोम (Gillian Barr syndrome) अर्थात मेंदूशी संबंधित आजार झाला आहे. तर या भागामध्ये एकूण जवळपास सात लाख नागरिकांना कोरोनावरील ऍस्ट्राझेनेकाची लस देण्यात आली आहे. अशी जी माहिती आहे ती भारत आणि ब्रिटनमधील (Britain) तज्ज्ञांनी केलेल्या दोन स्वतंत्र संशोधनांतून ही समोर आलीय. याबाबत एका वृत्तानुसार समजले आहे.

दरम्यान, केरळ (keral) आणि नॉटिंगहॅममधील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, भारतातील केरळमध्ये (keral) 7 तर ब्रिटनमधील (Britain) नॉटिंगहॅममध्ये 4 नागरिकांना गिलन बार सिंड्रोम (Gillian Barr syndrome) आजार झाला आहे. या सर्वानी दहा ते बारा दिवसांपूर्वी ही कोविशिल्डची लस घेतली होती. गिलन बार सिंड्रोम (Gillian Barr syndrome) आजार झाल्यानंतर शरीरातील मानवाच्या रोगप्रतिकारशक्ती चुकून मेंदूच्या आणि पाठीच्या कण्याच्या बाहेर असलेल्या परिघीय मज्जासंस्थेवर आघात करू लागते, अशी माहिती दिली आहे.

Web Title :- Covishield Vaccine | 11 had rare illness conclusions independent research experts india uk

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ ! आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास