केंद्राला 150, राज्यांना 400 रुपयांत डोस? व्हॅक्सीनच्या किंमतीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी लसीकरणाच्या नव्या टप्प्याची घोषणा झाली आहे. यासोबतच सीरम इन्स्टीट्यूटने सुद्धा कोविशील्ड व्हॅक्सीनचे दर घोषित केले आहेत. परंतु आता याबाबत नवीन वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून दावा केला आहे की, सीरम इन्स्टीट्यूट केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना वेगवेगळ्या दराने व्हॅक्सीन देत आहे, जे चुकीचे आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले की, केंद्र सरकारला कोविशील्ड 150 रुपये प्रति डोसच्या हिशेबाने मिळेल. परंतु राज्य सरकारांना 400 रुपये द्यावे लागतील. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. यातून संघीय संरचनेचे नुकसान होईल. यामुळे राज्यांवर जास्त भार पडेल. जे एकदम चुकीचे आहे. आम्ही मागणी करतो की, केंद्र-राज्य सरकारांसाठी एक देश, एक दर ठरवले जावे.

सीरम इन्स्टीट्यूटने बुधवारी प्रायव्हेट हॉस्पीटल आणि राज्य सरकारांसाठी व्हॅक्सीनचे दर जारी केले आहेत. राज्य सरकारांना 400 रुपये प्रति डोस आणि प्रायव्हेट हॉस्पिटलना 600 रुपये प्रति डोसच्या हिशेबाने पैसे चुकवावे लागतील.

केंद्र सरकारद्वारे व्हॅक्सीनच्या नवीन टप्प्याची जी सुरुवात केली गेली आहे, तो एक मेपासून सुरू होईल. या दरम्यान राज्य सरकार आणि प्रायव्हेट हॉस्पिटल थेट व्हॅक्सीन निर्मात्यांकडून व्हॅक्सीन घेऊ शकतील.

व्हॅक्सीनच्या कमतरतेवर सुद्धा काँग्रेसने घेरले
काँग्रेसने केंद्र सरकारवर व्हॅक्सीनच्या टंचाईवरून सुद्धा हल्ला सुरू केला आहे. काँग्रेस नेते अजय माकन म्हणणे आहे की, भारत जगातील सर्वात मोठा व्हॅक्सीन निर्माता देश आहे, परंतु अजूनपर्यंत 1.3 टक्के लोकसख्येलाच लस देता आली आहे. आपल्या देशातील लोकांनाच व्हॅक्सीनच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.