गाई – म्हशीच्या दुधात ‘कमाली’ची दरवाढ, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रोजमितीला दुधाची गरज ही घरपरत्वे भासत असते. त्यामुळे दुधाच्या दरात समतोल असणे अशी आशा सर्वसामान्यांना असते. परंतु दुधाच्या भावात आता वाढ झाली असून रविवारपासून लिटर मागे दोन रुपयांनी वाढ होणार आहे. गाईच्या आणि म्हशीच्या दुधात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय कल्याणकारी दूध संघाने घेतला आहे. आता नवीन दरानुसार गाईचे दूध ४८रुपये प्रतिलिटर व म्हशीचे दूध ५८ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

कल्याणकारी दूध संघाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस राज्य कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, सचिव प्रकाश कुतवळ, खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर यांच्यासह अजून इतर सदस्य आणि प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. या दुधाच्या वाढणाऱ्या किमतीचे कारण म्हणजे यंदा पाऊस उशिरापर्यंत पडल्यामुळे दूध उत्पादनात जवळपास १० टक्क्यांनी घट झाली आहे. आणि विशेष म्हणजे दरवर्षी हिवाळ्यात दूध उत्पादन वाढत असते मात्र यंदा याच्या उलट पाहायला मिळत आहे.

अशा काही कारणांमुळे दुधाच्या दरात वाढ करावी लागल्याचे कल्याणकारी दूध संघाने सांगितले असून रविवारपासून या वाढीव दरानुसार दूध विकत घ्यावे लागणार आहे. नव्या दरानुसार गाईच्या दुधाला ४६ रुपयांऐवजी ४८ रुपये तर म्हशीच्या दुधाला ५६ रुपयांऐवजी ५८ रुपये मोजावे लागणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/