साध्वींचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गोमूत्र पिल्याने कर्करोग बरा झाला. या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी साध्वींच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. साध्वींनी एका मुलाखतीत हे वक्तव्य केले. साध्वींनी केलेले हे विधान सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनले आहे.

साध्वी मुलाखतीत म्हणाल्या की, गोमूत्र पिल्यानेच माझा कर्करोग बरा झाला. तसेच गाईच्या पाठीवरुन हात फिरवल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावर टाटा रुग्णालयाचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे म्हणाले, साध्वींच्या या विधानात काहीच तथ्य नाही. अशा वक्तव्यामुळे लोक औषधी न घेता असले उपचार करत आहेत. त्यामुळे आजार आणखी वाढत वाढतो. त्यामुळेच कर्करोगाचे प्रमाण वाढत चाले आहे. आपल्या देशात कर्करोगाचे निदान तिसऱ्या चौथ्या टप्प्यात होते. त्यामुळे नागरिकांनी सावध होऊन वैद्यकीय उपचार करावा.

त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावा
टाटा रुग्णालयाचे डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले की, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेले विधान चुकीचे आहे. सामान्य लोकांनी अशा गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. कर्करोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय उपचार करावा.

कर्करोगतज्ज्ञ डॉ. निरंजन बामणे यांनी सांगितले की, सध्या सोशल मीडियामुळे हे वक्तव्य फार वेगाने व्हायरल होत आहे. या सगळ्या गोष्टींकडे सामान्य जनतेने दुर्लक्ष करा.