उद्या लसीकरणासह ‘Co-Win’ अ‍ॅप होईल ‘लॉन्च’, मार्चपर्यंत सामान्य जनता करू शकेल ‘नोंदणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारी 2021 रोजी कोरोना लसीकरण मोहीम सुरू करणार आहेत. देशभरातील फ्रंटलाइन योद्धयांना लसीचा पहिला डोस देण्याची तयारी सुरू आहे. भारतातील ही लसीकरण मोहीम ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की व्हर्चुअल पद्धतीने लसीकरण मोहिमेच्या शुभारंभानंतर पंतप्रधान मोदी अधिकृतपणे को-विन (Co-WIN) अ‍ॅप लाँच करतील.

केंद्र सरकारने कोविन (Covid Vaccine Intelligence Work) सुरू केले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात या नेटवर्कशी जोडलेल्या 80 लाख लोकांना लसीचा डोस देण्यात येणार आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून भारतातील आरोग्याचा डेटा एकाच ठिकाणी गोळा करण्यात मदत होईल. 23 डिसेंबर 2020 रोजी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कोविन सिस्टमला आणखी बळकट करण्याची घोषणा देखील केली होती, ज्यामध्ये असे नमूद केले होते की या संदर्भात मदत करणाऱ्या प्रथम आणि द्वितीय सहभागींना 40 लाख आणि 20 लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येईल.

आता नोंदणी करू शकता का?
जर आपल्या मनात असा प्रश्न असेल की कोविनवर आता रजिस्टर करता येईल की नाही, तर याचे उत्तर म्हणजे अ‍ॅप अद्याप फंक्शनमध्ये आलेले नाही. जर आपण गुगलवरून यासारखे एखादे अ‍ॅप डाऊनलोड केले असेल तर हे अ‍ॅप सध्या काम करणार नाही. असे एखादे अ‍ॅप जर आपल्या फोनमध्ये वैयक्तिक माहिती विचारत असेल तर सावधगिरी बाळगा. सध्या कोविन अ‍ॅप बॅक एंड सॉफ्टवेअर म्हणून काम करत आहे, ज्यास हेल्थवर्कर्सच्या पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी वापरले जाणार आहे. मार्च महिन्यापासून सामान्य जनतेला नोंदणीची सुविधा मिळेल.

या अ‍ॅपअंतर्गत 80 लाख लाभार्थ्यांची यापूर्वीच नोंदणी झाली असल्याची माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. सध्या या अ‍ॅपद्वारे कोणीही नोंदणी करू शकत नाही, फक्त या अधिकाऱ्यांनाच या अ‍ॅपवर प्रवेश देण्यात आला आहे. त्या अंतर्गत नोंदणी करण्यासाठी सामान्य लोकांसाठी चार मॉड्यूल तयार केले गेले आहेत.

कोणते आहेत चार मॉड्यूल?
प्रथम बॅक एंड मॉड्यूल आहे, ज्याच्या आधारावर अ‍ॅप सध्या काम करत आहे. दुसरे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर मॉड्यूल आहे ज्या अंतर्गत एकावेळी किती लोकांना लस दिली जाऊ शकते हे सांगितले जाईल. यामध्ये, अ‍ॅडमिन लसीचे सत्र देखील निश्चित करू शकेल. रजिस्ट्रेशन मॉड्यूल अंतर्गत, कोणीही स्वत:च्या लसीकरणासाठी नोंदणी करू शकतो. हे मॉड्यूल लसीच्या डेटाची नोंद ठेवण्यासाठी आहे. येथे लसीकरणाचा डेटा पडताळला जाईल आणि पुढील डोस कधी देण्यात येईल हेदेखील सांगितले जाईल. ब्लॉक स्तरावर देखील अशा मॉड्यूल अंतर्गत नोंदणी केली जाऊ शकते.

लसीकरणानंतर लाभार्थ्यास प्रमाणपत्रही देण्यात येईल. हे प्रमाणपत्र क्यूआर कोडद्वारे दिले जाईल. नियोजित सत्र आणि सेशन हेल्डचे देखील निरीक्षण केले जाईल. म्हणजेच लसीकरणासाठी किती वेळ ठेवला गेला आणि लसीच्या वेळी किती वेळ लागला यावर देखील सरकार आकडेवारी गोळा करेल.