कोविशील्ड व्हॅक्सीनचा दूसरा डोस घेणार्‍यांसाठी आवश्यक सूचना, CoWIN वर अपडेट झाला मोठा बदल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरस महामारीच्या विरूद्ध सुरू असलेल्या लसीकरण अभियानात आता एक नवीन वळण आले आहे. देशात व्हॅक्सीन टंचाईचे संकट पाहता सरकारने कोविशील्ड व्हॅक्सीनचा पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील अंतर 6-8 आठवड्याने वाढवून 12 ते 16 आठवडे केले आहे. हा नवीन बदल काल रविवारपासून कोविन पोर्टलवर सुद्धा अपडेट करण्यात आला आहे. मात्र, सरकारकडून ही सुद्धा माहिती देण्यात आली आहे की, ज्यांनी कोविशील्ड व्हॅक्सीनच्या दुसर्‍या डोससाठी अपॉईंटमेंट बुक केली आहे ती कॅन्सल करण्यात येणार नाही.

सरकारने या स्थितीत कोविशील्डच्या दोन्ही डोसमधील अंतर 6-8 आठवड्याने वाढवून 12-16 आठवडे केले होते. कोरोना व्हॅक्सीनच्या टंचाईदरम्यान लसीकरणासाठी गठीत केलेल्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (एनटीएजीआय) सरकारला शिफारस केली होती की, कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12-16 आठवडे करण्यात यावे. केंद्र सरकारने हा सल्ला मान्य करत अंमलात आणला आहे.

देशात कोराना लसीची टंचाई निर्माण झाल्याने सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे प्रमुख अदर पुनावाला यांनी म्हटले की, भारतात व्हॅक्सीन उत्पादन वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरूआहेत. उत्पादनाचा वेग वाढवण्यात आला आहे.