CoWin चे नवीन सिक्युरिटी फिचर ! व्हॅक्सीनेशन बुकिंगवर मिळेल कोड, जाणून घ्या कसे करणार काम?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या टप्प्याचे लसीकरण 1 मेपासून सुरू झाले आहे. या दरम्यान अनेक यूजरने व्हॅक्सीनसाठी स्लॉट बुक करताना डेटा एंट्रीमध्ये गडबडीची तक्रार केली आहे. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविन अ‍ॅपमध्ये अतिरिक्त सुरक्षा फिचरचा समावेश केला आहे ज्यामुळे यूजरला त्रास होणार नाही.

4 अंकी सिक्युरिटी कोड
केंद्र सरकारने 18-45 वर्षापर्यंतच्या सर्व प्रौढांना लसीकरणासाठी मंजूरी दिली आहे. आरोग्य केंद्रासोबतच सरकारने बनवलेल्या कोविन अ‍ॅपवर जाऊन ऑनलाईन सुद्धा लसीसाठी बुक करता येते. यानंतर कोविन अ‍ॅपवरून मोठ्या संख्येने यूजर लसीसाठी स्लॉट शोधत आहेत. परंतु अनेक लोकांना स्लॉटबाबत तक्रारी आहेत.

आता कोविन वेबसाइट व्हॅक्सीनेशनच्या स्लॉटच्या बुकिंगदरम्यान लोकांना 4 अंकी सिक्युरिटी कोड मिळेल. लसीकरण केंद्रावर हा कोड दाखवावा लागेल. मंत्रालयाने सांगितले की, हा कोड डिजिटल सर्टिफिकेटवर देखील काम करेल.

नवीन सिक्युरिटी फिचरसह असे करा रजिस्ट्रेशन
* कोविन अ‍ॅप सर्वसामान्यांसाठी नाही. व्हॅक्सीनेशनसाठी रजिस्ट्रशेन केवळ कोविन वेबसाइट किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपवद्वारे केले जाऊ शकते.
* कोविनवर मोबाइल नंबरद्वारे रजिस्ट्रेशन करता येते. यासाठी तुम्हाला वन टाइम पासवर्ड मिळतो.
* रजिस्ट्रेशनदरमयान फोटो आयडी कार्डवरील नंबर द्यावा लागेल. हे कार्ड लस घेण्यासाठी जाताना घेऊन जावे लागेल.
* कोविनवर रजिस्ट्रेशन आणि व्हॅक्सीनेशनसाठी स्लॉटचे बुकिंग दोन वेगळ्या गोष्टी आहेत. व्हॅक्सीनेशनसाठी सरकारी आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये व्हॅक्सीनच्या उपलब्धतेच्या आधारवर स्लॉट असल्यास केले जाऊ शकते.
* व्हॅक्सीनेशन स्लॉटचे बुकिंग यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर एक चार अंकी सिक्युरिटी कोड प्राप्त होईल जो व्हॅक्सीनेशनच्या दरम्यान द्यावा लागेल.