CoWin Portal वर स्वत: दुरूस्त करू शकता तुमचे व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट, ‘ही’ आहे अतिशय सोपी पध्दत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CoWin Portal | देशात कोरोना व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटची (Vaccination Certificate) आवश्यकता वाढत चालली आहे. अनेक राज्य आणि देशांनी व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटसोबत (CoWin Portal) प्रवास करणे अनिवार्य (Mandatory to Travel) केले आहे. मात्र, देशात व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटबाबत अनेक प्रकारच्या समस्या (Problems) सुद्धा येऊ लागल्या आहेत.

कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर काही लोक यासाठी त्रस्त आहेत, कारण त्यांच्या व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटमध्ये नाव, जन्म तारीख आणि आई-वडीलांच्या नावामध्ये चुका आहेत. काही लोकांचे तर कोविन पोर्टलवर सर्टिफिकेटच उपलब्ध होत नाही. यामुळे काही दिवसांपूर्वी कोविन पोर्टल (CoWin Portal) अपडेट करण्यात आले आहे. आता लोक स्वता सहजपणे व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटमध्ये बदल करू शकतात.

व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटमध्ये अशी करा दुरूस्ती

– व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी https://www.cowin.gov.in/ वर जा.

होम पेजवर How Can We Help You अगदी खाली रेज इन इश्यूचे आयकॉन दिसेल.

या आयकॉनमध्ये गेल्यानंतर अनेक पर्याय दिसतील. यापैकी गेट युअर सर्टिफिकेट करेक्टेडवर क्लिक करा.

आता एक नवीन विंडो उघडेल. या विंडोमध्ये तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर भरा.

नंतर एक ओटीपी येईल. ओटोपी भरताच सर्टिफिकेट कॉलम दिसेल.

या आयकॉनवर क्लिक करताच विचारले जाईल की नाव, वय, जेंडर किंवा फोटो कशात बदल करायचा आहे.

आपल्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या सर्टिफिकेटमध्ये बदल केल्यानंतर 24 तासानंतर सर्टिफिकेट दुरूस्तीसह कोविन अ‍ॅपवर मिळेल.

पासपोर्टसोबत जोडा व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट
जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर आपल्या व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटमध्ये पासपोर्ट नंबर सुद्धा अ‍ॅड करू शकता.

Web Title :- CoWin Portal | how to correct mistakes in covid vaccination certificate cowin portal online correction very easy steps

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोनं पुन्हा 1000 रुपयांनी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Anti Corruption | 2 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 10 लाख पोलिसानं घेतले; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

Covid Vaccination | व्हॅक्सीन घेण्यावरून एकमेकीवर तुटून पडल्या महिला, झाली जोरदार हाणामारी; ओढले एकमेकींचे केस (Video)