CoWIN पोर्टल झाले अपग्रेड, 1 एप्रिलपासून दररोज 1 कोटी रजिस्ट्रेशन स्वीकारले जाणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी देशभर लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोविड -19 लस नोंदणीसाठी को-विन (CoWIN) पोर्टल देखील अधिक कार्यक्षम बनविण्यात आले आहे. आता दररोज एक कोटी नोंदणी या पोर्टलवर स्वीकारता येतील. याद्वारे दररोज 50 लाख लोकांच्या लसीची नोंद होऊ शकते.

45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण 1 एप्रिलपासून सुरू केले जात आहे आणि त्यातून नोंदणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे ते सुधारीत केले गेले आहे.

रविवारी या पोर्टलवर 6 कोटीहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. कोविड -19 लसीकरणावर बनविलेल्या एम्पॉवर्ड ग्रुपचे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांच्या मते, “सिस्टममध्ये सुधारणा करणे ही एक सतत प्रक्रिया आहे आणि लोड वाढीमुळे, सिस्टमला त्या लोडशी जुळवून घेण्यात आले आहे. आम्ही आतापर्यंतचा कल पाहिला आहे. लसीकरण करणार्‍यांची संख्या वाढली आहे. ही प्रणाली चार स्तरावर कार्यरत आहे. सार्वजनिक नोंदणी, पडताळणीचे स्तर, व्यासपीठ व्यवस्थापन (लसी देणार्‍या रुग्णालयांसाठी) आणि प्रमाणपत्र निर्मितीसाठी होत आहे. ”

पोर्टलवर द्यावी लागेल तीन मूलभूत माहिती
शर्मा म्हणाले की, ही शंभर टक्के गव्हरमेंट रन सिस्टम आहे. दरम्यान, हे मान्य केले गेले की देशाच्या बर्‍याच भागांतून नोंदणी करण्यात त्रुटी आल्या आहेत. ते म्हणाले की, “सेल्फ रजिस्ट्रेशन आणि स्पॉट रजिस्ट्रेशन दरम्यान आम्ही फक्त तीन मूलभूत माहिती विचारत आहोत. नाव, लिंग आणि जन्म वर्ष. लाभार्थीं संबंधित माहिती योग्य देतील, अशी आम्हाला आशा आहे.”

दुसर्‍या डोससाठी स्वतः शेड्यूल करावे लागेल सेट

शर्मा म्हणाले की, सध्या को-विन दुसर्‍या डोससाठी अपॉइंटमेंट आपोआप होत नाही आणि लाभार्थ्यांना लसीच्या दोन डोसांमधील निर्धारित अंतरानुसार त्याचे शेड्यूल तयार करावे लागेल.