CoWIN पोर्टल पूर्णपणे सुरक्षित, केंद्राने म्हटले – ‘हॅक झाला नाही 15 कोटी भारतीयांचा डेटा’

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाची तिसरी लाट पाहता सरकारने कोरोना व्हॅक्सीन प्रोग्राममध्ये वेग आणण्याचा प्रयत्न करत आहे, तर काही लोक सरकारचे हे मिशन कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतेच वृत्त आले आहे की, भारताचे व्हॅक्सीन रजिस्ट्रेशन पोर्टल (CoWIN) कोविन (CoWIN) कुणीतरी हॅक केले आहे. तसेच म्हटले आहे की, पोर्टलवरून 15 कोटी भारतीयांचा डेटा सुद्धा चोरी करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात आता केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सरकारने अशा प्रकारचे कोणतेही वृत्त फेटाळले आहे म्हटले की, ’कोविन’ पोर्टल पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कोणत्याही भारतीयाचा डेटा चोरी झालेला नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे की, असे अनेक रिपोर्ट समोर आले आहेत
की कोविन प्लॅटफॉर्म हॅक झाला आहे.
आमच्या टीमला तपासात हे वृत्त बनावट असल्याचे आढळले आहे.
पोर्टलवरील सर्व माहिती सुरक्षित आहे.
मात्र, प्रकरणाचे गांभीर्य पाहता याचा तपास कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (ईजीव्हीएसी) कडून केला जात आहे.

ईजीव्हीएसीचे अध्यक्ष डॉक्टर आर. एस. शर्मा यांनी सांगितले की, सोशल मीडियावर भारताचे व्हॅक्सीन नोंदणी पोर्टल ’कोविन’ हॅक झाल्याचे वृत्त वायरल होत आहे.
आम्ही सर्वांना सांगतो की, कोविनवरील सर्व डेटा सुरक्षित आहे.
कोविनवरील माहिती कुणाशीही शेयर केलेली नाही.

डार्क लीक मार्केट नावाच्या एका हॅकर गटाने ट्विट करून याबाबत माहिती दिली होती की.
त्यांच्याकडे 15 कोटी भारतीयांचा डेटा आहे, ज्यांनी व्हॅक्सीन नोंदणीकरण पोर्टल ’कोविन’वर स्वताला रजिस्टर केले होते.
हॅकरने हे सुद्धा सांगितले होते की, ते ही माहिती 800 डॉलरमध्ये विकरणार आहेत.
मात्र, या ट्विटनंतर काही रिपोर्टमध्ये डार्क लीक मार्केटलाच बनावट हॅकर म्हटले गेले होते.

Also Read This : 

पाठीच्या मणक्याच्या वेदना आणि प्रतिबंधात्मक उपाय; जाणून घ्या

कोरोनातून बरे झालेल्या लोकांना व्हॅक्सीनची आवश्यकता नाही; पीएम मोदींना हेल्थ एक्सपर्ट्स सल्ला

केसांचे सौंदर्य खुलावण्यासाठी आवश्य करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

मराठा समाजाच्या आंदोलनाची तारीखठरली