‘आयडिया’च्या हलगर्जीपणामुळे नगरसेवकाच्या गायीचा मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आयडियाच्या टॉवरसाठी वीज जोड घेताना केबल टाकताना हलगर्जीपणा केल्याने वीजेचा धक्का बसून एका गाईला आपले प्राण गमवावे लागले. तळजाई पठार येथील दत्त मंदिराजवळील रस्त्यावर सोमवारी ही दुर्घटना घडली. स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांची ही गाय होती.

याबाबतची माहिती अशी, दत्तनगर येथील एका इमारतीवर आयडिया कंपनीचा मोबाईल टॉवर आहे. त्या टॉवरसाठी त्यांनी इमारतीसमोरुन वीज कनेक्शन घेतले आहे. दोन इमारतींच्या मधल्या रस्त्याखालून केवळ १ फुट खाली ही केबल टाकण्यात आली होती. याशिवाय ही केबल लोखंडी पाईपातून टाकण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी महापालिकेने खोदकाम केले होते. त्यावेळी हा लोखंडी पाईप तुटला असावा. पावसामुळे येथे छोटे छोटे खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साठले होते.

सुभाष जगताप यांचा तळजाई पठार येथे गोठा आहे. सोमवारी दुपारी चरण्यासाठी या गायी सोडण्यात आल्या. या गायी येथील रस्त्यावरुन जात असताना नेमका एका गायीचा पाय छोट्या खड्ड्यातील पाण्यात पडला. या खड्ड्यात वीजेचा प्रवाह उतरला होता. त्यामुळे या गायीला वीजेचा धक्का बसून तिचा जागीच मृत्यु झाला. या रस्त्यावरुन परिसरातील लोक जा ये करत असताना अनेकदा मुले येथे खेळत असतात. त्यांच्यापैकी चुकून कोणाचा पाय या पाण्यात पडला असता तर त्यांना जीवाला मुकावे लागले असते.

या दुर्घटनेनंतर महावितरण व आयडियाचे अधिकारी घटनास्थळी आले होते. जोपर्यंत आयडियाचे अधिकारी येऊन त्यांच्या चुकीचा माफीनामा लेखी देत नाही, तोपर्यंत त्यांचा टॉवरचा वीज पुरवठा सुरु होऊ देणार नसल्याचे सुभाष जगताप यांनी सांगितले.

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार