CP Amitabh Gupta | ‘गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक हा कायमच असला पाहिजे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोणी काळभोर (Loni Kalbhor Police Station), लोणीकंद (Lonikand Police Station), हडपसर पोलीस ठाण्याचे (Hadapsar Police Station) कार्य़क्षेत्र मोठे आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे दैनंदिन गुन्हेगारीचे (Pune Crime) प्रमाण वाढत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस बळ वाढवले असून गुन्हेगारावर पोलिसांचा वचक हा कायम राहिला पाहिजे, असे प्रतिपादन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी केले. हडपसर पोलीस ठाणे अंकीत हडपसर पोलीस चौकीचे (Hadapsar Police Chowki) उद्घाटन (Inauguration) आज (गुरुवार) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे (Hadapsar MLA Chetan Tupe), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (Hadapsar Division ACP Bajrang Desai), हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule), पोलीस निरीक्षक गुन्हे दिगंबर चव्हाण (Police Inspector Digambar Chavan) , पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे (Police Inspector Vishwas Dagle) यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) पुढे म्हणाले पुणे शहराचा (Pune City) पूर्वेकडील भाग वाढत वाढत चालला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूकीचा (Traffic) प्रश्न जटिल होत चालला आहे. यासाठी केवळ पोलिसांनी काहीतरी केले पाहिजे असे नाही. प्रत्येकाने नियमांचे पालन करायला पाहिजे. पोलीस आणि नागरिकांनी हातात हात घेऊन काम केले तर कोणतेही काम अशक्य नाही. सामान्य जनतेला प्रशासनाच्या सर्व सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे. तसेच पुण्याच्या पूर्व भागासाठी काळेपडळ (Kalepadal) आणि फुरसुंगी (Fursungi) या भागात नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव लवकरच संमत होईल, असेही अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

शहरामध्ये नवीन पोलीस ठाणे, चौकी व त्यांच्या इमारती होतील. यामध्ये सुसज्ज नियोजन देखील होईल.
परंतु डेव्हलपमेंट केलेला अधिकारी त्याच ठिकाणी राहील असे नाही. त्यामुळे आपण झाड लावयाचे, याची फळे पुढील येणाऱ्या पिढीला चाखायला मिळतील.
याचप्रमाणे आपण चांगले काम करत राहायचे. याचा फायदा पुढील काळात पोलीस प्रशासन आणि नागरिकांना होईल, असेही अमिताभ गुप्ता यावेळी म्हणाले.

 

या कार्य़क्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी केले.
सुत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन थोरात (API Sachin Thorat) यांनी केले.
तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोळुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Web Title :-  CP Amitabh Gupta | police should always be on the lookout for criminals amitabh gupta

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Stress Free Sleeping Tips | ‘या’ पद्धतीने घ्या झोप, 4 तासांमध्येच 8 तासांची झोप होईल पूर्ण

 

Pune Crime | बनावट मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅनकार्डद्वारे दुर्लक्षीत जमिनीचे करायचे व्यवहार, गुन्हे शाखेकडून 7 जणांच्या टोळीला अटक

 

Modi Government | गहू, साखर निर्यातबंदीपाठोपाठ मोदी सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय; ग्लोबल मार्केटमध्ये प्रचंड खळबळ