CP Retesh Kumaarr | औद्योगिक कंपन्या व व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या बेकायदेशीर संघटनांवर कडक कारवाई करणार, न घाबरता तक्रार करावी; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – औद्योगिक कंपन्या (Industrial Companies), आयटी कंपन्या (IT Companies) तसेच व्यापारी (Traders) यांना माथाडी किंवा माथाडीच्या (Mathadi Organization) नावाखाली कोणी त्रास देऊन खंडणी (Extortion) मागत असेल तर अशांवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी सांगितले. तसेच औद्योगिक कंपन्या, व्यापारी, आयटी कंपन्यांनी अनधिकृत माथाडी किंवा माथाडीच्या नावाखाली त्रास देणाऱ्या लोकांची तक्रार न घाबरता करावी असेही आवाहन त्यांनी (CP Retesh Kumaarr) केले.

मंगळवारी (दि.24) सायंकाळी पुणे पोलीस ( Pune Police) आयुक्तालयात पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांच्या अध्यक्षतेखाली पुणे आयुक्तालय हद्दीतील औद्योगिक कंपन्या, आयटी कंपन्या, व्यावसायीक व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स (Chamber of Commerce), इंडस्ट्रीज (Industries), अ‍ॅग्रीकल्चर (Agriculture) यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत पोलीस आयुक्त रितेश कुमार बोलत होते. यावेळी विविध संघटनांचे 100-120 प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी वर्गणीच्या नावावर खंडणी मागितली जाते, माथाडी कामगारांच्या मजुरीचे दर ठरवावेत, वाहतूक समस्येबाबत (Traffic Problem) योग्य त्या उपाय योजना कराव्यात यासंदर्भात मागण्या करण्यात आल्या.

संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांवर बोलताना पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, सर्वांच्या सूचना संबंधित पोलीस उपायुक्त परिमंडळ, पोलीस स्टेशनला कळवून योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच तक्रारदारांनी न घाबरता आपल्या तक्रारी द्याव्यात. वाहतुक समस्यांबाबत कंपन्यांशी संपर्क साधुन ट्राफिक वॉर्डनची संख्या वाढवण्याबाबत वाहतूक पोलीस उपायुक्तांना निर्देश यावेळी त्यांनी दिले.

तसेच औद्योगिक कंपन्या, आयटी कंपन्या, व्यापारी यांना माथाडी किंवा माथाडीच्या नावाखाली कोणी त्रास देवून खंडणी मागत असेल तर अशा गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. ही बैठक पुणे शहर पोलिसांनी पुढाकर घेऊन घेतली आहे. ती सर्वांच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडवून भयमुक्त वातावरण तयार करणे हा असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांसोबत पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत (Pune City Police Commissionerate) कार्यरत असणाऱ्या सर्व पोलीस उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी यांचे मोबाईल क्रमांक शेअर केले.

यावेळी सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, तक्रारदारास तक्रार देण्याबाबत भिती वाटत असेल
तर वरिष्ठ अधिकारी यांना समक्ष भेटून तक्रार द्यावी. तसेच वाहतुक समस्येबाबत वेगळी बैठक बोलावून
त्यावर तोडगा काढला जाईल असे कर्णिक यांनी सांगितले.

या बैठकिला पोलीस पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त विशेष शाखा आर.राजा (DCP R.Raja), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे
(DCP Amol Zende), पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ -4
शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख
(DCP Vikrant Deshmukh), पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर
(Traffic Branch DCP Vijay Kumar Magar), विशेष शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र साळुंके
(Special Branch ACP Rajendra Salunke), खंडणी विरोधी पथक पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,
पोलीस निरीक्षक वाघमारे, निरीक्षक माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ राजेश मते यांच्यासह
विविध संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title :- CP Retesh Kumaar | Strict action will be taken against illegal organizations harassing industrial companies and traders, complaints should be made without fear; Police Commissioner Ritesh Kumar’s appeal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

Jannat Zubair Rahmani | जन्नत जुबेरचा स्टायलिश लूक; मात्र लूकपेक्षा ‘या’ व्यक्तीने वेधले सर्वांचे लक्ष