CP Sanjay Pandey | गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CP Sanjay Pandey | मुंबईमधील गृहनिर्माण संस्थांमधील (Housing Society Mumbai) रहिवाशांसाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (CP Sanjay Pandey) यांनी मोठी घोषणा केली आहे. रविवारी फेसबुक लाइव्ह करत याबाबत त्यांनी माहिती दिली. गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांच्या तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी आणि त्यांच्या अडचणीं समजून घेण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला एक स्वतंत्र इन्स्पेक्टर (Inspector) असणार असं पोलिस आयुक्त पांडे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर मुंबईकरांसाठी सिटीझन फोरम (Citizen Forum) स्थापन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

घाटकोपरमधील म्हाडाच्या गृहनिर्माण संस्थेंच्या अध्यक्षाने बैठकीच्या इतिवृत्तामध्ये फेरफार केल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाने इतिवृत्तामध्ये फेरफार करत रहिवाशांबद्दल अपशब्दांचा वापर केल्याची तक्रार केली गेली होती. गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाने आपल्याविरोधात अपशब्दांचा वापर केल्याचे समजल्यानंतर रहिवाशांनी घाटकोपर मधील पोलीस ठाण्यात (Ghatkopar Police Station) तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिस आयुक्त संजय पांडे (CP Sanjay Pandey) यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

सिटीझन फोरमची निर्मिती..
संजय पांडे म्हणाले की, मुंबई पोलीसांचे (Mumbai Police) बारा विभाग आहेत.
तसेच, 5 उपविभाग असतील. सिटीझन फोरमची 1 वेबसाइट तयार केलीय. मुंबईकरांनी ती वेबसाइट तयार केली आहे.
mumbaicf.in अशी वेबसाइट असून त्याला भेट देऊन सूचना कळवाव्यात, असं ते म्हणाले.
तसेच, पोलिस आयुक्त पांडे यांनी सिटीझन फोरमची पहिली बैठक 18 मे रोजी सायंकाळी 6 ते 7 या काळात होईल.
पहिली बैठक मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात होईल. आगामी बैठका सिटीझन फोरमच्या सदस्यांनी घ्याव्यात, असं स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :- CP Sanjay Pandey | mumbai police commissioner sanjay pandey declared dedicated police inspector for housing societies complaints at stations

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा