CP Vinay Kumar Chaubey | विनय कुमार चौबे यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड आयुक्त पदाचा पदभार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त (Pimpri Chinchwad CP) विनय कुमार चौबे (CP Vinay Kumar Chaubey) यांनी बुधवारी (दि.14) सायंकाळी अंकुश शिंदे यांच्याकडून पदभार स्विकारला. अपर पोलीस महासंचालक (Addl DGP) विनय कुमार चौबे हे पिंपरी-चिंचवडचे पाचवे पोलीस आयुक्त आहेत. अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी (Nashik CP Ankush Shinde) बदली झाली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने मंगळवारी रात्री काढले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘दिशा’ उपक्रम राबवला. याशिवाय बेसिक पोलिसिंगवर भर दिला. यामध्ये कोम्बिंग ऑपरेशनसह गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात आला. तसेच शिंदे यांनी स्वत:लॉटरी सेंटरवर कारवाई केली. यानंतर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना (Senior Police Inspector) नियंत्रण कक्षाशी संलग्न (Attached to Control Room) केले तर इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली.

दरम्यान, मंगळवारी रात्री अंकुश शिंदे यांची बदली होऊन विनय कुमार चौबे (CP Vinay Kumar Chaubey)
यांची पिंपरी चिंचवड आयुक्तपदी नियुक्ती गृह विभागाने केली. चौबे (IPS Vinay Kumar Chaubey) यांनी
आज (बुधवार) सायंकाळी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.

Web Title :-  CP Vinay Kumar Chaubey | ips vinay kumar chaubey take charge of pimpri chinchwad police commissioner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | बोपदेव घाटातील तरुणाच्या खूनाचा उलगडा, मित्रांकडून चुकून गोळी उडाल्याने तरुणाचा मृत्यू; गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

Vedamurthy Pandav | ‘2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि उद्धव ठाकरे…’ – वेदमूर्ती पांडव यांची भविष्यवाणी