CPM नेते सीताराम येचुरी यांच्या मोठ्या मुलाचे कोरोनामुळे 34 व्या वर्षी निधन; गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. राजकारण्यांपासून ते  सेलिब्रिटी पर्यंत सर्वानाच कोरोना झाला आहे. गुरुवारी सकाळी  सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी (वय ३४) यांचे कोरोनाने निधन झाले.  गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये त्यांच्यावर सुरु होते. पहाटे सहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने  कुटुबियांमध्ये, मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सीताराम येचुरी यांनी ट्विटरवर हि माहिती दिली. आशिष एक पत्रकार  असून दिल्लीतील एका वृत्तपत्रासाठी सीनिअर कॉपी एडिटर म्हणून काम करत होते.

सीताराम येचुरी यांनी  केलेल्या ट्विट मध्ये कोरोना वॉरियर्सचे आभार मानत दुःखही व्यक्त केलं आहे. माझ्या मोठ्या मुलाला आशिषला कोरोमनांमुळे मी गमावलं आहे. ज्यांनी आम्हाला आशा दिली आणि ज्यांनी त्याचे उपचार केले – डॉक्टर, परिचारिका, फ्रंटलाइन आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि असंख्य इतर जे आमच्या पाठीशी उभे होते त्यांच्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. दरम्यान,  सीताराम येचुरींच्या दु:खात अनेक नेते सहभागी होत, आशिष यांना श्रद्धांजली वाहिली आहे.